ICHMH51NEWS.IN
9921600800

छत्रपती संभाजी महाराज जयंतीनिमित्त इचलकरंजी महापालिकेकडून अभिवादन

👇बातमी ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

छत्रपती संभाजी महाराज जयंतीनिमित्त इचलकरंजी महापालिकेकडून अभिवादन

इचलकरंजी :
इचलकरंजी महानगरपालिकेच्या वतीने छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त गुरुवारी श्री शंभुतीर्थ येथील छत्रपती संभाजी महाराजांच्या पुतळ्यास महापौर उदय धातूंडे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आले.यावेळी माजी आमदार प्रकाश आवाडे, माजी आमदार सुरेश हाळवणकर, उपमहापौर अनिल डाळ्या आणि अतिरिक्त आयुक्त सुषमा शिंदे यांची प्रमुख उपस्थिती होती.
कार्यक्रमास उपायुक्त विद्या कदम, सभागृह नेते विठ्ठल चोपडे, स्थायी समिती सभापती सतीश मुळीक, परिवहन समिती सभापती अरुणा बचाटे, प्रभाग समिती सभापती सुशांत कलागते, अभिषेक वाळवेकर यांच्यासह नगरसेवक, नगरसेविका, माजी नगरसेवक आणि महानगरपालिकेचे अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

छत्रपती संभाजी महाराजांना अभिवादन करताना महापौर उदय धातूंडे,अति आयुक्त सुषमा शिंदे,माजी मंत्री प्रकाश आवाडे,माजी आमदार सुरेश हाळवणकर व नगरसेवक, नगरसेविका.
ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA

घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

पुढे वाचा