उन्हाळी सुट्टी व अधिकमासानिमित्त इचलकरंजी आगाराकडून विशेष धार्मिक पर्यटन बससेवा
विविध तीर्थक्षेत्रांसाठी सवलतीच्या दरात सुविधा; ग्रुप बुकिंगलाही प्राधान्य
इचलकरंजी/प्रतिनिधी –
उन्हाळी सुट्टी आणि अधिकमासाच्या पार्श्वभूमीवर इचलकरंजी राज्य परिवहन आगारामार्फत धार्मिक तीर्थाटन व पर्यटन स्थळांसाठी विशेष बससेवा उपलब्ध करून देण्यात आली आहे. महिला सन्मान, ज्येष्ठ नागरिक तसेच अमृत ज्येष्ठ नागरिक योजनेंतर्गतही या सेवांचा लाभ घेता येणार आहे.
इचलकरंजी आगाराने विविध धार्मिक व पर्यटन स्थळांसाठी परतीसह विशेष मार्ग निश्चित केले आहेत. त्यामध्ये इचलकरंजी–११ मारुती दर्शन–परत, इचलकरंजी–मार्लेश्वर–गणपतीपुळे– परत, इचलकरंजी–गणपतीपुळे–रत्नागिरी– परत, इचलकरंजी–आंबोली–रेडी गणपती–सिंधुदुर्ग–परत, इचलकरंजी–पंढरपूर–शिखरशिंगणापू र–परत, इचलकरंजी–पंढरपूर–अक्कलकोट–परत, इचलकरंजी–पंढरपूर–तुळजापूर–परत, इचलकरंजी–पंढरपूर–अक्कलकोट–तु ळजापूर–परत, इचलकरंजी–प्रति बालाजी–जेजुरी–परत, इचलकरंजी–शिर्डी–शनिशिंगणापूर– परत तसेच इचलकरंजी–नाशिक–त्र्यंबकेश्वर– वणी (सप्तशृंगी)–परत या मार्गांचा समावेश आहे.
या मार्गांसाठी अनुक्रमे ७०५ रुपये, ७७५ रुपये, ७६५ रुपये, ८३० रुपये, ७८५ रुपये, १०८० रुपये, १०८५ रुपये, १३७० रुपये, ९२० रुपये, १६६० रुपये आणि २२०० रुपये असे पूर्ण तिकीट दर निश्चित करण्यात आले आहेत. तसेच अर्ध्या तिकिटाची सुविधाही उपलब्ध आहे. सदर तिकीट दर इचलकरंजी बसस्थानकापासून लागू राहणार आहेत.
याशिवाय प्रवाशांच्या गावातून इच्छित धार्मिक किंवा पर्यटन स्थळांसाठी ग्रुप बुकिंगद्वारेही बसेस उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. इचलकरंजी व परिसरातील भाविकांनी या विशेष योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन राज्य परिवहन इचलकरंजी आगाराच्या वतीने करण्यात आले आहे.
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800





