इचलकरंजीत विजेचा धक्का लागून १० वर्षीय मुलाचा मृत्यू
इचलकरंजी :
शहरात विजेचा धक्का लागून १० वर्षीय मुलाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना बुधवारी दुपारी घडली. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
शिवाजीनगर पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, विहान शहाबाज शेख (वय १०, रा. शाहूनगर, गंगा बिल्डिंग अपार्टमेंट, कागल) हा आपल्या नातेवाईक गुलाब पटेल यांच्या हॉटेल पॅराडाईज शेजारी असलेल्या राहत्या घरी वास्तुशांती साठी आला होता. दि. १३ मे रोजी दुपारी सुमारे १२.३० वाजण्याच्या सुमारास घरात अलमोडा फॅन जोडण्यासाठी लावलेल्या इलेक्ट्रिक सॉकेटला त्याचा पाय लागला. यावेळी त्याला विजेचा जोरदार धक्का बसला.
घटनेनंतर मुलाला तातडीने उपचारासाठी नेण्यात आले. मात्र त्याचा मृत्यू झाला. या घटनेमुळे कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून परिसरात शोककळा पसरली आहे.
याप्रकरणी इकबाल मियालाल मुजावर यांनी दिलेल्या जबाबावरून शिवाजीनगर पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. या घटनेचा पुढील तपास पोहेकॉं कौलगे करीत आहेत.
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800





