राज्यस्तरीय काव्यलेखन स्पर्धेस उत्स्फूर्त प्रतिसाद, निकाल जाहीर
इचलकरंजी:
येथील महाराष्ट्र साहित्य परिषद शाखा इचलकरंजी आणि रोटरी क्लब ऑफ इचलकरंजी सेंट्रल यांच्या संयुक्त विद्यमाने घेण्यात आलेल्या राज्यस्तरीय मराठी काव्यलेखन स्पर्धेस महाराष्ट्र तसेच इतर राज्यातूनही अतिशय चांगला प्रतिसाद मिळाला. या स्पर्धेत २३८ नवोदित कवी, कवयित्रींनी सहभाग घेतला, स्पर्धेत प्रणाली देशमुख, अमरावती यांनी प्रथम क्रमांक, सुजित कदम, पुणे यांनी द्वितीय क्रमांक तर युवराज पाटील, दिंडनेर्ली यांनी तृतीय क्रमांक मिळविला.
याबरोबरच अनिता कांबळे बदलापूर, स्वप्नाली ढोणुक्षे इचलकरंजी, गोविंद पारकर चेंबूर, संजय कांबळे शिप्पूर बेळगाव, दीप्ती कुलकर्णी हैदराबाद, योगेश काळे बावधन, नेत्रा पवार डोंबिवली आणि अनुराधा काळे इचलकरंजी यांच्या कवितांची उत्तेजनार्थ पारितोषिकासाठी निवड करण्यात आली आहे. परीक्षणाची जबाबदारी प्रा. सौरभ पाटणकर, प्रा. डॉ. प्रतिभा पैलवान आणि महावीर कांबळे यांनी उत्तमरीत्या पार पाडली.
या स्पर्धेच्या आयोजनासाठी समन्वयक म्हणून मसाप इचलकरंजी शाखेचे कार्याध्यक्ष राजन मुठाणे व सहसमन्वयक म्हणून कार्यवाह पवन चौगुले यांनी जबाबदारी पार पाडली. सदर स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ या महिन्याच्या अखेरीस होणार आहे अशी माहिती संयोजकांच्या वतीने मसाप इचलकरंजीच्या अध्यक्षा वैशाली नायकवडे आणि रोटरी क्लब सेंट्रलचे अध्यक्ष घनश्याम सावलानी यांनी दिली आहे.
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800







