ICHMH51NEWS.IN
9921600800

महेश नवमी उत्सवानिमित्त महेश मॅराथॉन २०२६ उत्साहात संपन्न

👇बातमी ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

महेश नवमी उत्सवानिमित्त महेश मॅराथॉन २०२६ उत्साहात संपन्न

इचलकरंजी :
श्री महेश नवमी उत्सव २०२६ निमित्त आयोजित करण्यात आलेली महेश मॅराथॉन २०२६ स्पर्धा उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली. या स्पर्धेचे आयोजन श्री महेश सेवा समिती आणि श्री महेश नवयुवक मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले होते.
या कार्यक्रमाला इचलकरंजी महानगरपालिकेचे उपमहापौर अनिल डाळ्या तसेच कोल्हापूर जिल्हा माहेश्वरी सभा अध्यक्ष नितीन धूत प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. मॅराथॉनमध्ये माहेश्वरी समाजातील युवक, युवती तसेच लहान मुला-मुलींनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला. स्पर्धेत सुमारे १५०० स्पर्धकांनी सहभाग नोंदवला, त्यामुळे कार्यक्रमाला विशेष उत्साहाचे स्वरूप प्राप्त झाले.
या उपक्रमाचे नियोजन श्री महेश नवयुवक मंडळ आणि कोल्हापूर जिल्हा माहेश्वरी युवा संघटना यांच्या सहकार्याने करण्यात आले. स्पर्धेत सहभागी झालेल्या सर्व स्पर्धकांचा शिल्ड देऊन गौरव करण्यात आला. तसेच विविध गटांतील ७० विजेत्यांना शिल्ड व प्रमाणपत्र देऊन पारितोषिक वितरण समारंभात सन्मानित करण्यात येणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली.
कार्यक्रमादरम्यान उपमहापौर अनिल डाळ्या यांचा सत्कार अध्यक्ष द्वारकाधीश सारडा यांनी पुष्पगुच्छ देऊन केला, तर नितीन धूत यांचा सत्कार वेणुगोपाल मुंदडा यांनी केला. कार्यक्रमाचे प्रायोजक दिनेश बिडला व मनोज बिडला यांचाही सन्मान करण्यात आला. तसेच स्पर्धेच्या नियोजनात विशेष योगदान दिल्याबद्दल महेश शेळके सर व अर्जुन सर यांचाही गौरव करण्यात आला.
या प्रसंगी अध्यक्ष द्वारकाधीश सारडा, न्यासी प्रमुख वेणुगोपाल मुंदडा, सचिव लक्ष्मीकांत बांगड, नवयुवक मंडळ अध्यक्ष अखिल बाहेती, सचिव अक्षय जाखोटिया, गोपाल मोहता, माहेश्वरी महिला मंडळाच्या पदाधिकाऱ्यांसह समाजातील विविध संस्थांचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या शेवटी आयोजकांनी उपस्थितांचे आभार मानले.
मॅरेथॉन स्पर्धेचे उद्घाटन करताना मान्यवर
ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA

घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

पुढे वाचा