प्रबोधिनीत योग दिन साजरा
इचलकरंजी ता.२२ समाजवादी प्रबोधिनी, प्रबोधन वाचनालय आणि पतंजली योग समिती यांच्या संयुक्त विद्यमाने समाजवादी प्रबोधिनीच्या सभागृहात जागतिक योग दिन साजरा करण्यात आला. यावेळी योगशिक्षक विजय पवार यांनी योगासनामुळे शारीरिक व मानसिक आरोग्य कसे सुदृढ राहते याची अनेक उदाहरणे देऊन स्पष्टीकरण केले. तसेच योगासनाची प्रात्यक्षिकेही घेण्यात आली. त्यात ज्योती रेवणकर ,शारदा जासू, शोभा पाटील, प्रसाद कुलकर्णी ,शशांक बावचकर,अशोक केसरकर, दयानंद लिपारे ,शकील मुल्ला,पांडुरंग पिसे, नारायण लोटके आदींनी सहभाग घेतला.
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800







