प्रबोधिनीत शाहूराजांना अभिवादन
इचलकरंजी:
राजेशाही आणि संस्थानिकांच्या कालखंडातील लोकराजा म्हणून बहुमोल कामगिरी करणारे आणि सामाजिक न्यायाची प्रस्थापना करणारे छत्रपती शाहू महाराज हे छत्रपती शिवरायानंतरच्या लोकनिष्ठ राजांपैकी एक महत्त्वाचे लोकराजे होते. रयतेचे राज्य ही संकल्पना खऱ्या अर्थाने रुजविणारे ते राजे होते.महाराष्ट्र व भारत खऱ्या अर्थाने संपन्न करायचा असेल तर छत्रपती शिवराय आणि शाहू- फुले -आंबेडकर यांच्या विचारांच्या मार्गानेच आपल्याला वाटचाल नकरावी लागेल. तीच त्यांना खरी आदरांजली ठरेल असे मत समाजवादी प्रबोधिनी व प्रबोधन वाचनालय यांच्या वतीने राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या १५२ व्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात व्यक्त करण्यात आले . प्रारंभी वृत्तपत्र पत्रलेखक संघाचे सचिव संजय भस्मे यांच्या हस्ते आणि डॉ.आंबेडकर विकास संस्थेचे प्रमुख ललित बाबर यांच्या प्रमुख उपस्थितीत राजर्षी शाहू महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी प्रसाद कुलकर्णी, प्रा. रमेश लवटे , पांडुरंग पिसे,महेंद्र जाधव, प्रभा यादव, अश्विनी अहिवळे, अमोल कदम, आनंदा कांबळे, बाबासाहेब वडवे,अशोक भोसले, सुनील कांबळे, संजीव आगळे आदी उपस्थित होते.
अभिवादन करताना ललित बाबर,संजय भस्मे,प्रसाद कुलकर्णी
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800







