सनातन धर्माची मुलतत्त्वे पुसणे हा संविधान घोटाळा- पुष्पेंद्र कुलश्रेष्ठ
इचलकरंजी
संविधान सभेमध्ये सेक्युलर या शब्दावर डिलीट झाले. तत्कालीन नेत्यांनी सेक्युलर हे भारताच्या मातीत अनाधिक काळापासून आहे, त्यामुळे नव्याने हा शब्द घेण्यासाठी विरोध दर्शवत सेक्युलर शब्द लिहून समाजाला छोटा करू नका, असे आवाहन केले. मात्र आणीबाणीच्या काळात राजकीय सत्तेसाठी सेक्युलरचा समावेश केला गेला. वेळोवेळी हव्या त्या पद्धतीने बदल करून सनातन धर्माची मूलतत्वे पुसून टाकली, हा संविधान घोटाळा म्हणावा लागेल, असे परखड मत राष्ट्रवादी विचारांचे परखड वक्ते पुष्पेंद्र कुलश्रेष्ठ यांनी येथे मांडले.
येथील श्रीमंत ना. बा. घोरपडे नाट्यगृहात शिवराणा युथ फोर्स बहुउद्देशीय सेवा संस्थेच्यावतीने कुलश्रेष्ठ यांच्या प्रबोधनपर जाहीर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी त्यांनी `विश्वगुरू भारत` या विषयावर बोलत होते. यावेळी नाट्यगृह खचाखच भरले होते.
अडीच तासाच्या व्याख्यानात दैदीप्यमान इतिहासा
ते म्हणाले, आज आपण बांग्लादेशाची चिंता करत बसलोय. पण त्यापेक्षा भयानक अवस्था भारताची आहे. आता समाज जागृतीसाठी चित्रपटांची वाट बघू नका तर स्वयंजागृत व्हा आणि संघटितपणे सामाजिक ताकद दाखवा. यापुढे सर्वात मोठ्या लोकशाही देशातील निवडणुकीत स्वतःला कवडीमोल दरात विकू नका आणि मतांसाठी विकलो हा इतिहास ठेवू नका.
महाराष्ट्र राज्यात छत्रपती शिवाजी महाराजांचा खूप महिमा आहे. मात्र तो छत्रपतींचा जोश, उत्तेजना महाराष्ट्रात कुठेच दिसत नाही. महाराष्ट्रात पुन्हा पुन्हा छत्रपती शिवाजी महाराज जन्माला येण्यासाठी जिजाबाई जन्माला कधीच आल्या नाहीत, ही खंत असून सत्तेसाठी बापाला विकण्याची वेळ न येता महाराष्ट्र कसा होता, याची जबाबदारी आपली आहे.
धर्मनिरपेक्षता ही अनादी काळापासून भारतीय मातीत आहेत. त्यामुळे नविन धर्मनिरपेक्षता आणण्याची गरज नाही. मात्र स्वार्थासाठी सत्तेच्या दलालानी यामध्ये बदल केला. त्यामुळे त्याला विरोध आहे. भारतीय समाजातील संस्कृती, संस्कार, परंपरा, मान्यता जाणवू नयेत म्हणून त्या पुसल्या गेल्या. यासाठी आता अनंत, अनादी असणाऱ्या खरेपणाचे जिवंतपाणी जिवंत असल्याचे पुरावे द्या. आपल्यातील आवाजाला जागे करा. देशाच्या स्थितीबद्दल जाणून घ्या. तरच क्रांती रातोरात होईल, असे आवाहनही कूलश्रेष्ठ यांनी केले. संपूर्ण व्याख्यानात कुलश्रेष्ठ यांनी भारतीय इतिहासातील गौरवशाली क्षणांवर प्रकाश टाकला. प्राचीन भारतीय संस्कृती, विद्या, आणि तत्त्वज्ञान यांचे महत्त्व स्पष्ट केले. श्रोत्यांनी पुष्पेन्द्र कुलश्रेष्ठ यांच्या परखड आणि ठाम विचारांना जोरदार प्रतिसाद दिला.
आझाद भारतानंतर संसदेत प्रथमच पंडीत ओंकारनाथ ठाकूर यांनी संपूर्ण वंदे मातरम् गायले होते. त्यानंतर वंदे मातरम गीत कापले. पुढे एका कार्यक्रमात लतादीदींच्या आवाजात पूर्ण वंदे मातरम वाजले आणि पूर्ण देशाला नवी उर्जा व जोश मिळाला होता. आता संसदेतही पूर्ण वंदे मातरम लतादीदींच्या आवाजात वाजायला हवे, अशी भावना कुलश्रेष्ठ यांनी व्यक्त केली.

Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800