आ.रा.पाटील कन्या महाविद्यालयात सहविचार सभा संपन्न.
येथील श्रीमती आक्काताई रामगोंडा पाटील कन्या महाविद्यालयाच्या कनिष्ठ विभागाच्या वतीने शिक्षक-पालक-विद्यार्थिनी सहविचार सभेचे आयोजन करण्यात आले होते. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ बाबासाहेब दुधाळे यांच्या प्रमुख उपस्थितीत ही सहविचार सभा उत्साहात संपन्न झाली.शिक्षणमहर्षी डॉ.बापूजी साळुंखे यांनी इचलकरंजी सारख्या कामगार वस्ती जास्त असणाऱ्या भागात मुलींच्या शिक्षणाची गरज लक्षात घेऊन हे एकमेव असणारे कन्या महाविद्यालय उभे केले.ज्यामध्ये अकरावीपासून पदवीपर्यंतचे शिक्षण खास मुलींना डोळ्यासमोर ठेवून दिले जाते.
मुलींच्या एकूण सामाजिक, शैक्षणिक सुरक्षिततेसाठी आमचे कन्या महाविद्यालय आणि आमचे प्राध्यापक अतिशय तन्मयतेने काम करतात,असे मत महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ बाबासाहेब दुधाळे यांनी व्यक्त केले.
शैक्षणिक सेवा कालात भेटलेल्या अनेक विद्यार्थ्यांची उदाहरणे देऊन विद्यार्थिनींनी आपल्या आई-वडिलांच्या प्रति आदराची भावना नेहमीच जपली पाहिजे, असे मत त्यांनी व्यक्त केले.भविष्यात विद्यार्थिनीच्या सुरक्षेच्यादृष्टीने तसेच शैक्षणिक विकासाची जबाबदारी हे महाविद्यालय नेहमीप्रमाणेच पार पाडेल, असे आश्वासन त्यांनी पालकांना दिले.
यावेळी श्रीमती बोरगांवकर सोनाली आणि श्रीमती जाधव एकता या शिक्षकांनी आपली मनोगते व्यक्त केली. तसेच सौ. सुविधा सचिन काशीद यांनी सर्वच विद्यार्थिनींना उद्देशून मुलींनी आपल्या अंगी चांगले संस्कार बाणवले पाहिजेत, असे मत व्यक्त केले.
तर श्री इलाई हुसेन मुल्ला यांनी आज स्त्रिया पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून प्रत्येक क्षेत्रामध्ये कार्य करत आहेत, राणी लक्ष्मीबाई,जिजामाता,ताराराणी यासारख्या महिलांचा आदर्श विद्यार्थ्यांनी घेऊन आपली वाटचाल करावी,असे मत व्यक्त केले. महाविद्यालयातील एकूणच कामकाजाबद्दल समाधान व्यक्त करताना आमच्या मुली आम्ही अगदी विश्वासाने कन्या महाविद्यालयांमध्ये पाठवतो कारण इथं सुरक्षितता आम्हाला जाणवते, आमच्या विद्यार्थिनींच्या सर्वांगीण विकासासाठी हे महाविद्यालय सर्वतोपरी मदत करते, प्रयत्न करते, असे मत त्यांनी व्यक्त केले.
कुमारी संस्कृती डोणे आणि सायली देसाई त्या विद्यार्थिनींनी महाविद्यालयात दिले जाणारे शिक्षण, येथील संस्कार, शिस्त,सुविधा याबद्दल आपले मत व्यक्त केले.
या कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक कनिष्ठ विभाग प्रमुख श्री ए जे कुंभार यांनी केले तर सूत्रसंचालन श्रीमती एम डी गवळी यांनी केले. आभार श्री प्रकाश मुडशी यांनी मानले.या कार्यक्रमासाठी कनिष्ठ विभागातील सर्व विद्यार्थिनी, त्यांचे पालक, गुरुदेव कार्यकर्ते, प्रशासकीय सेवक, शिक्षकेतर कर्मचारी बहुसंख्येने उपस्थित होते.

Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800