सुनील महाजन युवा शक्ती व रवींद्र माने युथ फोर्स आयोजित लाखमोलाच्या दहीहंडीवर शिवशक्ती व शिवनेरी पथकाने कोरले नांव.

👇बातमी ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

सुनील महाजन युवा शक्ती व रवींद्र माने युथ फोर्स आयोजित लाखमोलाच्या दहीहंडीवर शिवशक्ती व शिवनेरी पथकाने कोरले नांव.
इचलकरंजी
माजी उपनगराध्यक्ष सुनील महाजन व शिवसेना कोल्हापूर जिल्हा प्रमुख रवींद्र माने यांच्या नेतृत्वाखालील सुनील महाजन युवा शक्ती व रवींद्र माने युथ फोर्स यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित लाखमोलाची दहीहंडी महिला गटात डोंबिवलीच्या शिवशक्ती या गोविंद पथकाने तर पुरुष गटात तासगावच्या शिवनेरी या गोविंद पथकाने फोडली. डॉल्बीच्या ठेक्यावर थिरकणारी तरुणाई, गोविंद पथकांमध्ये लागलेली चढाओढ आणि जमलेल्या जनसमुदायाच्या उपस्थितीत ही स्पर्धा उत्साहात पार पडली. यावेळी महिला पथकांनी उपस्थितांची मने जिंकली.
सुनील महाजन युवा शक्ती व रवींद्र माने युथ फोर्स च्या वतीने प्रथमच दहीहंडी स्पर्धेचे आयोजन केले होते. विजेत्या शिवनेरी गोविंद पथकास १,५१,००१ रुपये व आकर्षक ट्रॉफी तर शिवशक्ती गोविंद पथकास १,००,००१रुपये व आकर्षक ट्रॉफी खासदार धैर्यशील माने, सुनील महाजन, रवींद्र माने यांच्या हस्ते देण्यात आली. केशरी ढोल ताशा पथक, डीजे साऊंड, लक्ष वेधकलाईट इफेक्ट्स आणि मनमोहक आतिषबाजीने स्पर्धेला वेगळीच रंगत आणली. तर पुण्याच्या दीप्ती हलवाई यांच्या सूत्रसंचालनाने कार्यक्रमाला एक वेगळी उंची लाभली.
खास मुंबईहून महिला गोविंदा (गोपिका) पथके आली होती. हेच या स्पर्धेचे विशेष आकर्षण होते. महिला गोविंदानी आपले कसब दाखवत रचलेले मनोर्‍यांनी उपस्थिताना दाद देण्यास भाग पाडले. महिला गटात मुंबईचे अष्टविनायक महिला गोविंद पथक आणि डोंबिवलीचे शिवशक्ती महिला गोविंद पथक तर पुरुष गटात कुटवाडचे नरसिंह गोविंद पथक व आठ थरासाठी प्रसिद्ध सांगली जिल्ह्यातील तासगावचे शिवनेरी गोविंद पथक अशी चार पथके सहभागी झाली होती.
दहीहंडीचे पूजन मदन कारंडे यांचे हस्ते तर स्पर्धेचा शुभारंभ माजी आमदार सुरेश हाळवणकर, शिवसेना जिल्हाप्रमुख रवींद्र माने, माजी उपनगराध्यक्ष सुनील महाजन व मान्यवरांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आला. सुरुवातीला सर्व संघांनी सहा थर रचत सलामी दिली. त्यानंतर चिठ्ठी टाकून संघाना हंडी फोडण्याची संधी देण्यात आली. त्यामध्ये सर्वच संघांमध्ये चढाओढ सुरु होती. अखेर तासगांवच्या शिवनेरी गोविंद पथकाने आठ थर लावत दहीहंडीवर आपले नांव कोरले. तर महिला गटात शिवशक्ती गोविंद पथकाने बाजी मारत दहीहंडी फोडली.
तत्पूर्वी सुनील महाजन यांच्या निवासस्थानपासून दहीहंडी व ट्रॉफी यांची ढोलताशांच्या गजरात मिरवणूक काढण्यात आली. यावेळी अजित जाधव, तारदाळ सरपंच सौ. पल्लवी पवार, सतीश डाळ्या, भाऊसो आवळे, राहुल खंजीरे, रवी रजपुते, पै. अमृता भोसले, अनिल डाळ्या, विनोद कांकाणी, विठ्ठल चोपडे, शितल दत्तवाडे, भैरूलाल अग्रवाल, पवन टीबडेवाल, भवरलाल चौधरी, पुनमचंद दरगड, इंदरचंद लोया आदींसह राजकीय, सामाजिक, व्यापारी वर्गातील मान्यवर उपस्थित होते. तर स्पर्धा काळात रुग्णवाहिका सेवा व वैद्यकीय सेवा अथायू हॉस्पिटल कोल्हापूर यांच्या वतीने पुरवण्यात आली.
ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA

घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

पुढे वाचा

इचलकरंजी महानगरपालिका वर्धापन दिनाचे औचित्य साधून जुन महिन्यात विविध कार्यक्रमांचे आयोजन-आयुक्त तथा प्रशासक पल्लवी पाटील.इमनपा आणि ज्ञानेश्वर मुळे फौंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने रोजगार मेळाव्याने कार्यक्रमाचा शुभारंभ

Read More