महिला अत्याचाराच्या घटनेचा इंदिरा गांधी सामान्य रुग्णालयाकडून निषेध
कोलकत्ता येथे झालेल्या महिला डॉक्टर यांचेवरील अत्याचार व हत्या तसेच उत्तराखंड येथील एका परिचारीकेवरील अत्याचार व हत्या तसेच रत्नागिरी येथील एका परिचारिकेवर झालेला अत्याचार व महाराष्ट्रातील बदलापूर व कोल्हापूर येथील शिये येथील बालकांच्या वरील लैंगिक अत्याचार व हत्या या अमानुष क्रूर घटना ह्या माणुसकीला काळिमा फासून समाजात तीव्र असंतोष निर्माण करीत आहेत त्यामुळे रुग्णांची तळमळतेने सेवा करणाऱ्या व कोव्हिड काळात असंख्य रुग्णांना सेवा देत प्राण वाचविलेल्या या कोव्हिड योध्यांवर अत्याचार करून त्यांचेच जीव घेतले जात आहेत हे दुर्दैवी आहे. बालकांचे होणारे लैंगिक शोषण व स्त्रियांच्या वरील अत्याचार व महिला डॉक्टर्स व परिचारिकांवरील अत्याचार व हल्ले यापासून बचाव करण्यासाठी काही खास उपाय योजना करण्यात येणे आवश्यक आहे व त्या तत्काळ कराव्यात जेणेकरून आपल्या बहिणी व मुले सुरक्षित राहतील व निर्भीड वातावरणात सुरक्षित राहतील यासाठी शासन स्तरावून आवश्यक ती कार्यवाही करण्यात यावी व झालेल्या सर्व घटनांचा निषेध करण्यासाठी आज बुधवार दिनांक २८/८/२०२४ रोजी सकाळी इंदिरा गांधी सामान्य रुग्णालय,इचलकरंजी येथे रुग्णालयातील सर्व शासकीय वैद्यकीय अधिकारी आणि सर्व परिसेविका,परिचारिका व आरोग्य कर्मचारी यांनी एकत्र येऊन निषेध नोंदवला.

Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800