मुख्य रस्त्यावरील बाजाराला शिस्त लावण्याचे महापालिकेचे नियोजन ढासळले,घोषणा कागदावरच,पोलिसांचेही सहकार्य नाही.

इचलकरंजी
इचलकरंजी शहरात २ वर्षांपूर्वी मुख्य बाजारपेठेत एका ट्रॅव्हल्स ऑफिसला आग लागल्याने अग्निशमन गाडीसही जाता न आल्याने मोठा अडथळा निर्माण झाला होता.त्यानंतर मागील वर्षी थोडाफार प्रयत्न महापालिकेने केला असता तो ही उधळण्यात आला होता.
यावर्षी महापालिकेने एस टी,पोलीस प्रशासनाची बैठक घेऊन वाहतुकीस अडथळा होणार नाही यानुसार नियोजन केले.त्यानुसार ११ फूट रस्ता मध्ये वाहतुकीस खुला ठेवत दोन्ही बाजूनी बसण्याची परवानगी दिली.मांडव घालण्याची परवानगी उच्च न्यायालयाच्या आदेशाने नाकारण्यात आली होती मात्र त्यातही पालिका प्रशासनाने लवचिकता दाखवत बाजार कर ठेकेदाराच्या फायद्यासाठी उच्च न्यायालयाचा आदेश डावलत तोंडी परवानगी दिली.
त्यानंतर आज दुपारपर्यंत सुरळीत असलेली वाहतूक आज काही व्यापाऱ्यांच्या हट्टापुढे विस्कळीत झाली. व्यापाऱ्यांनी अग्निशमन वाहतूक व अतिक्रमण विभागाची गाडी अडवून ठेवत ठिय्या मारत रास्ता रोको केला.त्यानंतर पालिका प्रशासनाने हतबल होत काढता पाय घेतला.
महापालिका प्रशासनास पोलीस खात्याचे बैठकीत ठरल्याप्रमाणे कोणतेही सहकार्य लाभले नाही,तसेच महापालिकेच्या अतिक्रमण विभागाने आरोग्य विभागाकडे १०० कर्मचारी यांची मागणी केली असताना कर्मचारी पुरवला नाही तर मार्केट विभाग व इस्टेट विभागाच्या प्रमुख अधिकाऱ्यांनी दूरध्वनी न उचलणे पसंत केले. क्लार्क दर्जाच्या अधिकाऱ्यावर जबाबदारी सोपवून आयुक्त, उपायुक्त दर्जाचे अधिकारी निवांत मजा बघत बसले व नेहमीप्रमाणे बाजाराचे नियोजन जाणीवपूर्वक हजारो रुपये खर्च करून प्रसिद्धी बॅरिकेटर्स चा खर्च करून बिघडवले असा आरोप करदात्या नागरिकांनी केला आहे.
खवरे मार्केट ठिकाण निश्चित केले असतानाही तेथे कोणतीही सुविधा उपलब्ध न केल्याने तिकडे कोणतेही व्यापारी जाण्यास धजावले नाहीत.
आयुक्तांची घोषणा म्हणजे लांडगा आला रे आला.
इचलकरंजी महापालिकेने गावास शिस्त लागावी यासाठी नागरिकांची निवेदने प्राप्त झाल्यावर बैठका घेण्याचे व प्रसिद्धी करण्याचे नाटक केले,व अपुरे मनुष्यबळ नियोजनशून्य कारभाराने त्यांचा फज्जा उडाला,आयुक्तांनी दोन दिवसांपूर्वी रस्त्याच्या मध्ये बसल्यास कारवाई करणार असल्याचा इशारा दिला मात्र तो ही लांडगा आला रे आला असा ठरल्याची चर्चा नागरिक करत आहेत.
राज्य महामार्ग बंद झाल्याची जबाबदारी कोण घेणार.
सर्वसामान्य नागरिक आंदोलन करत असताना पोलीस खाते राज्य महामार्ग बंद होत असल्याचे कारण देऊन परवानगी नाकारत असते आता राज्य महामार्ग बंद झाल्याची जबाबदारी कोण घेणार आणि पोलीस प्रशासन कारवाई कुणावर करणार,सर्वसामान्य नागरिकांना कायद्याचा बडगा दाखवणारे पोलीस राज्य महामार्ग बंद केल्याची जबाबदारी घेणार का आपल्या अधिकाऱ्यांना सावरून घेणार याकडे जनतेचे लक्ष लागले आहे.

Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800