खो-खो स्पर्धेत इलेव्हन, बालभारत, डायनॅमिक, शिवछत्रपती संघाची विजयी सलामी
L
इचलकरंजी
येथील डायनॅमिक स्पोर्टस् क्लबच्या वतीने आणि कोल्हापूर खो-खो असोशिएशनच्या सहकार्याने १४ वर्षाखालील मुलांच्या खो-खो स्पर्धांचा उत्साहात प्रारंभ करण्यात आला. यामध्ये बालभारत, इलेव्हन, डायनॅमिक, शिवछत्रपती संघ यांनी विजयी सलामी दिली.
डायनॅमिक स्पोर्टस् क्लबच्या मैदानावर या स्पर्धा सुरु आहेत. स्पर्धेचा शुभारंभ बाळू काकडे, राहुल पाटील, संजय कुडचे आदींच्या हस्ते मैदान पुजनाने करण्यात आला. स्वागत व प्रास्ताविक शेखर शहा यांनी केले. या स्पर्धेत इलेव्हन संघ, डायनॅमिक स्पोर्टस्, सरस्वती स्पोर्टस्, जयहिंद मंडळ, बालभारत संघ, कुडीत्रे संघ, सीआरएसएसयु, रवि अॅकॅडमी आदी १२ संघ सहभागी झाले आहेत.
बालभारत संघाने प्रतिस्पर्धी सीआरएसएसयुवर, इलेव्हन संघाने कुडीत्रे संघावर, डायनॅमिक स्पोर्टस्ने टाकवडे स्पोर्टस्वर आणि शिवछत्रपती संघाने रवि अॅकॅडमी संघावर मात करुन विजयी सलामी दिली. पंच म्हणून दत्तात्रय सरवदे, मंदार कुलकर्णी, सागर पोवार, राहुल रजपुत, सोमनाथ कोले, संभाजी बंडगर, राहुल चौगुले काम पहात आहे. उद्घाटनप्रसंगी शांतीनाथ मुसळे, दिगंबर वेर्णेकर, राहुल कुलकर्णी, संजय पाटील, अमोल अडसुळ, अमित कागले, पवन चावरे, ऋषिकेश आंबी, ऋतुराज शिंदे, वसिम बागवान, अक्षय माळी, अनिकेत कुकडे आदींसह खेळाडू उपस्थित होते.

Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800