इचलकरंजीत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने शिवकार्य सदस्य नोंदणी अभियानाला प्रारंभ..५० हजार सदस्य करण्याचे उद्दिष्ट.
इचलकरंजी
महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि विद्यमान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा ६१ वा वाढदिवस इचलकरंजी शहर शिवसेनेच्या वतीने विविध उपक्रमांनी उत्साहात साजरा करण्यात आला,वाढदिवसाच्या निमित्ताने येथील महात्मा गांधी पुतळ्या नजीक शिवकार्य सदस्य नोंदणी अभियानाला प्रारंभ करण्यात आला, शिवसेना जिल्हाप्रमुख रवींद्र माने यांच्या नेतृत्वाखाली आणि शहर प्रमुख भाऊसाहेब आवळे यांच्या मार्गदर्शनाखाली दिवसभर विविध उपक्रम राबवण्यात आले,
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा वाढदिवसानिमित्त शिवसेनेच्यावतीने शहरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते, सकाळी येथील मारुती मंदिरात अभिषेक घालून एकनाथ शिंदे यांना दीर्घायुष्य लाभू दे अशी प्रार्थना करण्यात आली यावेळी नागरिकांना लाडू आणि मिठाईचे वाटप करण्यात आले त्यानंतर शिवसेनेच्या शिवकार्य सदस्य नोंदणी अभियानाला प्रारंभ करण्यात आला या सदस्य नोंदणीला शहरातील नागरिकांनी उस्फूर्त प्रतिसाद दिला इचरकंजी विधानसभा मतदारसंघांमध्ये सुमारे ५० हजार सदस्यांची नोंदणी करण्याचे उद्दिष्ट ठेवले असल्याचे जिल्हाप्रमुख रवींद्र माने यांनी यावेळी स्पष्ट केले तर शहरातील प्रत्येक भागात शिवसैनिक सदस्यांची नोंदणी करण्यासाठी अभियान राबवतील विशेषतः लाडक्या बहिणींना या अभियानात जोडून घेण्यासाठी आम्ही विशेष प्रयत्न करणार आहोत असे शहर प्रमुख भाऊसाहेब आवळे यांनी सांगितले संपूर्ण दिवसभर सुरू असलेल्या या उपक्रमाला जनतेतून चांगला प्रतिसाद मिळाला या उपक्रमावेळी महिला आघाडीच्या जिल्हाप्रमुख वैशालीताई डोंगरे, युवती सेना जिल्हाप्रमुख सलोनीताई शिंत्रे, माजी उपनगराध्यक्ष रवी रजपुते, इकबाल कलावंत, माजी आरोग्य सभापती रविंद्र लोहार,माजी नगरसेवक प्रकाश पाटील उपशहरप्रमुख सुशील खैरमोडे, जिल्हा संघटक मोहन मालवणकर, ऋषी गौड,संदीप माने, महिला आघाडी शहरप्रमुख स्नेहांकिता भंडारे, शहरप्रमुख रुपालीताई चव्हाण, उपशहरप्रमुख दिपाताई देसाई, उपशहरप्रमुख मिनाताई भिसे, उपशहरप्रमुख दिप्ती भोकरे, रेखाताई बिरंजे, विभागप्रमुख शंकुतला पाटील, विद्याताई जाधव, सोनाली आडेकर, वैशाली शिंदे, सरिता पांडव, शितल जाधव,शिवाजी जगताप, महेश ठोके विलासकाका माने, विनायक काळे, संताजी जाधव, हेमंत कांबळे, रमेश काळे, दीपक जगताप,राजू लायकर,विनायक सूर्यवंशी, अमित शिरगुरे, लखन कांबळे, ऋतुराज शिंत्रे, ओंकार घोरपडे, अभिजित डुब्बल, शिवसेना पदाधिकारी, नागरिक उपस्थित होते.
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800









