‘Outline of Tally  with GST’ या विषया वरील कार्यशाळा संपन्न

👇बातमी ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

‘Outline of Tally  with GST’ या विषया वरील कार्यशाळा संपन्न
इचलकरंजी:
डी. के. ए. एस. सी. कॉलेज , इचलकरंजी मध्ये कॉमर्स विभागा अंतर्गत  ‘Outline of Tally  with GST’ या विषयावरील कार्यशाळा नुकतीच संपन्न झाली. प्रारंभी मान्यवरांच्या शुभहस्ते दीप प्रज्वलन व संस्था प्रार्थना झाली. कार्यक्रमाचे स्वागत विभाग प्रमुख प्रा. विजय पाटील यांनी केले. कार्यशाळेची प्रस्तावना व तज्ञांची ओळख प्रा. पूजा पारिशवाड यांनी केली. पहिल्या सत्रात महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी चार्टर्ड अकाऊंटन्ट (CA) श्री पवनकुमार सोनी बोलताना म्हणाले की वस्तू व सेवा कर याला खूप व्याप्ती आहे. वाणिज्य क्षेत्रातील विद्यार्थ्यांना त्यात चांगली संधी दिवसेंदिवस निर्माण होत आहेत. देशाची वाढती अर्थव्यवस्था व जीडीपी वाढ झाल्यामुळे वस्तू व सेवा कर या क्षेत्रामध्ये दिवसेंदिवस कुशल मनुष्यबळाची गरज निर्माण होईल असा आशावाद त्यांनी व्यक्त केला. ते बोलताना म्हणाले की वस्तू व सेवांचा पुरवठा, पुरवठ्याची वेळ, पुरवठ्याचे ठिकाण आणि त्यावर आधारित कर रचना आहे. 2% पासून ते 28% पर्यंत जी . एस. टी. कोणकोणत्या वस्तू व सेवांचा यामध्ये समावेश होतो याबाबतचे विवेचन ही तज्ञांनी केले. वस्तू व सेवा कराची यंत्रणा-  SGST, CGST आणि IGST काय आहे आणि कशी चालते याबाबत ही आढावा घेऊन आजची तरुण पिढी वस्तू व सेवा कराच्या दृष्टीने भारताचे भविष्य घडवणारे आहेत असा आशावाद ही त्यांनी व्यक्त केला.
दुसऱ्या सत्रात ‘एम. कॉम्प्युटरचे’ संचालक मा. श्री पंकजजी मेहता यांनी प्रत्यक्ष उदाहरणाद्वारे जीएसटी टॅली सॉफ्टवेअर ची प्रात्यक्षिके सादर केली. कंपनीचे नाव, कर रचना, SGST, CGST, IGST कशा पद्धतीने ही कर रचना टॅली सॉफ्टवेअर मधून वापरली जाते त्याचे प्रात्यक्षिक त्यांनी सादर केले. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी मा. प्राचार्य एस. एम. मणेर हे होते. वाणिज्य क्षेत्रातील वस्तू व सेवा कर यामध्ये विद्यार्थ्यांनी संधी आत्मसात केल्या पाहिजेत, त्याद्वारे कौशल्याची निर्मिती होईल असा आशावाद त्यांनी व्यक्त केला. या कार्यशाळेचे आभार डॉ . आर. एस. रॉड्रिक्स, सूत्रसंचालन प्रथमेश गवळी यांनी केले. कार्यशाळेस प्रा पल्लवी होगाडे, प्रा. अदिती ढोकरे व कॉमर्स विद्याशाखेतील प्राध्यापक उपस्थित होते. विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

फोटो-सी. ए. पवनकुमार सोनी यांचे स्वागत करताना मा. प्राचार्य डॉ. एस. एम. मणेर, श्री. पंकज मेहता, विभाग प्रमुख प्रा. विजय पाटील, प्रा. पूजा पारिशवाड आणि डॉ. रितू रॉड्रिक्स 

ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA

घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

पुढे वाचा

Read More