इचलकरंजी महानगर पालिकेच्या वतीने जागतिक जल दिनानिमित्त चर्चा सत्र संपन्न.
इचलकरंजी
इचलकरंजी महानगरपालिका पर्यावरण विभाग आणि पंचगंगा प्रदूषणमुक्ती संघर्ष समितीच्या वतीने दि.२२ मार्च रोजी जागतिक जल दिनानिमित्त चर्चा सत्राचे आयोजन करणेत आलेले होते.
कार्यक्रमाचा शुभारंभ प्र. उपायुक्त विजय राजापूरे यांचे हस्ते वृक्षारोपण करुन करणेत आला.
पंचगंगा प्रदूषणमुक्ती संघर्ष समितीचे अध्यक्ष बजरंग लोणारी राणे यांनी आपल्या मनोगतामध्ये जागतिक जल दिनाचे औचित्य साधून सर्व पंचगंगा नदी व पर्यावरण प्रेमींनी एकत्र येऊन इचलकरंजी शहराची पिण्याच्या पाण्याची समस्या निर्माण झाली आहे त्याबाबत ठोस व शाश्वत उपाय योजना करणेसाठी स्थानिक प्रशासन व शासन यांचेकडे पाठपुरावा करणे आणि सामान्य नागरीकांत जल साक्षरता कशी निर्माण करता येईल यासाठी प्रयत्न केले पाहिजेत असे मत मांडले.
शहरातील पर्यावरण तज्ञ संदीप चोडणकर यांनी आपले मनोगत व्यक्त करताना करताना सद्यःस्थितीत पाणी प्रदूषणाची समस्या तसेच पाणी टंचाई मोठ्या प्रमाणात जाणवत आहे. त्यामुळे या गंभीर समस्यांना तोंड देण्यासाठी नागरिकांनी एकत्र आलं पाहिजे. जलसाक्षरता, व योग्य जलनिती तयार करून स्थानिक जलस्रोतांचे बळकटी करण करणे हाच शाश्वत मार्ग होऊ शकतो त्याचबरोबर आता आपल्या हक्काच्या असलेल्या पंचगंगा नदीकडे प्रामुख्याने लक्ष द्यावे लागेल , पंचगंगा नदीला अमृत वाहिनी बनवावे लागेल असे मत व्यक्त केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक पंचगंगा प्रदूषण मुक्ती संघर्ष समितीचे सदस्य मुकुंद तारळेकर यांनी केले.
या चर्चासत्रात इचलकरंजी महानगरपालिकेचे सी झोनचे मुख्य स्वच्छता निरीक्षक मंगेश दुरुगकर, स्वच्छ्ता निरीक्षक बबन कांबळे, सूरज पांगरे, कविता सोळंकी यांचेसह शहरातील पर्यावरण प्रेमींनी सहभाग नोंदवला यामध्ये बजरंग लोणारी , शोभा इंगळे, राजू नदाफ, ज्योत्स्ना भिसे, किरण कटके,पद्मजा इंगवले,रमेश पाटील इत्यादी मान्यवरांनी सहभाग घेतला.
आभार प्रदर्शन उमेश कांबळे पर्यावरण विभाग अधिक्षक यांनी केले.

Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800