बाल वाचन संस्कार शिबिराची सांगता
इचलकरंजी – आपटे वाचन मंदिर इचलकरंजी येथे बाल वाचन संस्कार शिबिर अतिशय उत्साहात
शतकोत्तर सुवर्णमहोत्सवी आपटे वाचन मंदिर येथे २००६ पासून प्रत्येत वर्षी एप्रिल महिन्यात इ. ७ वी च्या विद्यार्थ्यांसाठी बाल वाचन संस्कार शिबिर घेण्यात येते. याचा समारोप ख्यातनाम लेखिका व कवयित्री सौ. नीलम माणगावे यांच्या पुस्तक हंडीने झाला तत्पूर्वी त्यांनी कविता कशी सुचते कथा लिहिताना एखादा धागा सापडल्यावर आपण सत्य व कल्पना यांच्या आधाराने ती कशी फुलवतो यासाठी स्वत च्या कविता व कथा सांगितल्या. शिबिरार्थीचे भरभरुन कौतुक केले व सर्व शिबिरार्थीनी वाचन केल्यानंतर यामधील श्रेया खाडे व चि. विरेन खारपंदे यांना उत्कृष्ट वाचक पुरस्कार देण्यात आला. विविध साहित्यप्रकारातील वाचन शिबिरार्थीनी केले त्यामध्ये कविता वाचन, व्यक्तिचित्रे, जंगलातील प्रवास, विज्ञानकथा, मजेदार गाणी, देशोदेशीचे बालवीर, संघटना आणि कार्यकर्ता, मराठीतील कोडी, न्यूटनचे अज्ञान समारोपाच्या प्रारंभी ग्रंथांवरचा श्लोक तसेच ग्रंथ आमुचे साथी ही कविता सामुदायिकरित्या म्हणण्यात आली.
यानंतर पाहुण्यांच्या हस्ते सरस्वतीचे पूजन झाले. यावेळी सरस्वती स्तवन शिबिरार्थीनी म्हटले. आठवडाभर संस्थेचे संचालक श्री. अशोक केसरकर, प्रा. मोहन पुजारी, श्री. बापूसाहेब तारदाळकर, प्रा. सुजीत सौंदत्तीकर, श्री. काशिनाथ जगदाळे, उपाध्यक्ष सौ. हर्षदा मराठे व कार्यवाह माया कुलकर्णी यासर्वांनी मार्गदर्शन केले तसेच निवृत्त प्रा. उमेश हेब्बाळकर यांचेही मोलाचे सहकार्य लाभले. शिबिरार्थीमधीलच किर्ती माळी व तन्मय काशिद या दोघांनी सर्व कार्यक्रमाचे सूत्रसंचलन केले. याप्रसंगी श्रीमंत गंगामाई गर्ल्स हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजच्या प्राचार्य सौ. अनिसा काजी व त्यांचे पती सिकंदर काजी हजर होते. अखेर आभार कार्यवाह माया कुलकर्णी यांनी मानले. अध्यक्ष सुषमा दातार
सहकार्यवाह डॉ. कुबेर मगदूम यांचेही प्रोत्साहन या शिबिराला लाभले. शिबिप्रमुख म्हणून कार्यवाह यांनी काम पाहिले. जाताना पुस्तक हंडी होऊन त्यातील एक एक पुस्तक व प्रशस्तिपत्रक शिबिरार्थीना देण्यात आले
प्रशस्तीपत्र वितरित करताना आपटे वाचन मंडळाचे कार्यकारी मंडळ

Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800