ICHMH51NEWS.IN
9921600800

मैत्री फाउंडेशनचे सोनार्ली  गावामध्ये मदतकार्य

👇बातमी ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

मैत्री फाउंडेशनचे सोनार्ली  गावामध्ये मदतकार्य

इचलकरंजी
इचलकरंजी व परिसरामध्ये आपल्या वेगवेगळ्या सामाजिक शैक्षणिक तसेच पर्यावरण विषयक उपक्रमांमुळे सुप्रसिद्ध असणाऱ्या मैत्री फाऊंडेशनने पेठ वडगाव जवळील सोनार्ली  गावामध्ये शैक्षणिक मदत केली. सोनार्ली  गावातील अंगणवाडीमध्ये शिकणाऱ्या गरीब व गरजू विद्यार्थ्यांना गणवेशाचे प्रत्येकी दोन संच,वह्या पुस्तके ठेवण्यासाठी सॅक , बसण्यासाठी जमखाने व विविध प्रकारची शैक्षणिक उपकरणे,खेळणी  तसेच तक्ते वगैरे या गोष्टी प्रत्यक्ष जागेवर जाऊन पोहोच केल्या. उपस्थितांनी मैत्री फाऊंडेशनच्या या उपक्रमाचे मनापासून कौतुक केले. उपक्रमाप्रसंगी मैत्री फाऊंडेशनचे अध्यक्ष चंद्रप्रकाश छाजेड , मैत्री महिला परिवार प्रमुख वहिदा नेजकर , आशा सातपुते मॅडम, अशोक खोत सर , उज्वल चराटे , पांडुरंग गोरे हे उपस्थित होते. सोनार्ली  गावातील सौ रंजना लाखन मॅडम , सौ अश्विनी सदाशिव सपकाळ मॅडम  व सौ अस्मिता दिनेश सोनार्लीकर यांनी स्वागत , प्रास्ताविक व आभार मानले.
सोनार्ली गावात मदत करताना चंद्रप्रकाश छाजेड व मैत्री परिवारातील सदस्य
ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA

घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

पुढे वाचा