ICHMH51NEWS.IN
9921600800

कोल्हापूर विमानतळाच्या वेगवान विकासासाठी नवी दिल्लीत सकारात्मक बैठक — खासदार धनंजय महाडिक

👇बातमी ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

कोल्हापूर विमानतळाच्या वेगवान विकासासाठी नवी दिल्लीत सकारात्मक बैठक — खासदार धनंजय महाडिक

नवी दिल्ली:
कोल्हापूर विमानतळाच्या सर्वांगीण आणि वेगवान विकासासाठी आज नवी दिल्लीत नागरी हवाई वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय बैठक पार पडली. या बैठकीत कोल्हापूरचे राज्यसभा खासदार धनंजय महाडिक यांनी विमानतळाच्या विस्तारीकरणासाठी महत्त्वाच्या मुद्द्यांवर ठोस चर्चा केली.

सध्या १९३० मीटर असलेली धावपट्टी पहिल्या टप्प्यात २३०० मीटरपर्यंत वाढवणे आणि पुढील टप्प्यात ती ३ हजार मीटरपर्यंत नेणे आवश्यक असल्याचे सांगण्यात आले. यासाठी लागणाऱ्या पर्यायी रस्त्याच्या कामास प्रारंभ झाल्याची माहिती जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी दिली.

या बैठकीस नागरी उड्डाण प्राधिकरणाचे वरिष्ठ अधिकारी — सुरज मल, एम. सुरेश, सुजय डे, ए.एस. महेशा, कोल्हापूर विमानतळाचे संचालक अनिल शिंदे आणि जिल्हाधिकारी अमोल येडगे उपस्थित होते.

Advt

खासदार महाडिक यांनी कोल्हापूरहून मुंबई आणि दिल्लीसाठी नियमित आणि सोयीस्कर वेळेची विमानसेवा सुरु करावी, तसेच थेट दिल्ली सेवा सुरू करण्यासाठी आवश्यक मनुष्यबळ व तांत्रिक सुविधा विमानतळावर तातडीने उपलब्ध करून द्याव्यात, अशी जोरदार मागणी केली.

विमानतळ श्रेणी ५ वरून श्रेणी ६ मध्ये वर्ग करण्यासंदर्भात चर्चा झाली असून, यामुळे मोठ्या क्षमतेची विमाने कोल्हापुरात उतरू शकतील. याशिवाय आंतरराष्ट्रीय विमानसेवेच्या दृष्टीने अत्याधुनिक तंत्रज्ञान, उपकरणे आणि पायाभूत सुविधा उभारण्याच्या दृष्टीनेही सहमती दर्शवण्यात आली.

नामदार मोहोळ यांनी विमानतळ प्राधिकरणाला स्पष्ट सूचना देत कामास गती देण्याचे निर्देश दिले.

बैठकीनंतर खासदार धनंजय महाडिक यांनी सांगितले की, “आजच्या सकारात्मक चर्चेमुळे कोल्हापूर विमानतळाच्या विकासाला नवीन दिशा व गती मिळणार असून, येत्या काळात कोल्हापूरचे हवाई कनेक्टिव्हिटी अधिक सक्षम होणार आहे.”

बैठकीत केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ,खा.धनंजय महाडिक,जिल्हाधिकारी अमोल येडगे,विमानतळ संचालक अनिल शिंदे

ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA

घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

पुढे वाचा