इचलकरंजी महानगरपालिकेच्या वतीने हर घर तिरंगा उपक्रमा अंतर्गत तिरंगा बाईक आणि सायकल रॅली आणि देशभक्तीपर गीतांचा कार्यक्रम संपन्न
इचलकरंजी
*’हर घर तिरंगा’* मोहीमे अंतर्गत इचलकरंजी महानगर पालिकेच्या वतीने मंगळवार दि.१२ ऑगस्ट रोजी महानगरपालिका अधिकारी कर्मचारी यांच्या *सायकल आणि मोटरसायकल रॅलीचे* आयोजन करणेत आलेले होते.
या रॅलीमध्ये महानगरपालिकेच्या आयुक्त तथा प्रशासक पल्लवी पाटील,अति.आयुक्त सुषमा शिंदे, उपायुक्त अशोक कुंभार, उपायुक्त राहुल मर्ढेकर, उपायुक्त विद्या कदम यांची प्रमुख उपस्थिती होती.
आजची तिरंगा रॅली महानगर पालिका मुख्य कार्यालय- शिवतीर्थ – महात्मा गांधी पुतळा – लोकमान्य टिळक पुतळा – रसना कॉर्नर मार्गे श्रीमंत नारायणराव घोरपडे नाट्यगृह येथे या रॅलीची सांगता करणेत आली .
या अनुषंगाने श्रीमंत नारायणराव घोरपडे नाट्यगृह येथे ॲड. बाबासाहेब निकम संचलित हरी ओम संगीत मंचच्या हौशी कलाकारांनी देशभक्ती जागवणाऱ्या गीतांचा बहारदार कार्यक्रम सादर केला.
आजच्या रॅली मध्ये मुख्य लेखा व वित्त अधिकारी विकास खोळपे, सहा. आयुक्त विजय राजापुरे, प्रशासन अधिकारी इरफान पटेल, मुख्याध्यापक शंकर पोवार, अग्निशमन अधिकारी सौरभ साळुंखे, समाज विकास अधिकारी सुनील शिंदे, शाखा अभियंता डॉ. बाजीराव कांबळे, क्रीडा अधिकारी संजय शेटे, महिला बाल विकास अधिकारी बेबी नदाफ,भांडार अधिक्षक सुजाता दाभोळे, धनंजय पळसुले, विजय पाटील, मंगेश दुरुगकर, महादेव मिसाळ, यांचेसह सर्व अधिकारी कर्मचारी तसेच प्राथमिक माध्यमिक शाळेचे शिक्षक आणि सरस्वती हायस्कूलचे विद्यार्थी सहभागी झाले होते. त्याचबरोबर देशभक्तीपर गीत गायनाच्या कार्यक्रमात समीर चौगुले, प्रताप जाधव, भुषण भिवरे, निलेश लोखंडे, रफिक नदाफ, विजय यादव, अमृता पोवार, शुभांगी कुलकर्णी हे हरी ओम संगीत मंचचे कलाकार सहभागी झाले होते.
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800








