ICHMH51NEWS.IN
9921600800

नारळीपौर्णिमा, रक्षाबंधन व अंगारकी संकष्टी निमित्त इचलकरंजी आगाराची भरघोस कमाई

👇बातमी ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

नारळीपौर्णिमा, रक्षाबंधन व अंगारकी संकष्टी निमित्त इचलकरंजी आगाराची भरघोस कमाई

इचलकरंजी
नारळीपौर्णिमा, रक्षाबंधन तसेच अंगारकी संकष्टी या सणांच्या पार्श्वभूमीवर इचलकरंजी आगारामार्फत कोल्हापूर, सांगली, मिरज, नृसिंहवाडी, पेठवडगाव, निपाणी, पुणे, सोलापूर आणि गणपतीपुळे आदी प्रमुख मार्गांवर जादा बसेसची सोय करण्यात आली होती. प्रवासी बांधवांच्या उत्स्फूर्त प्रतिसादामुळे आगाराला तब्बल ४३ लाख २२ हजार रुपयाचा व्यवसाय मिळाला.

आगार व्यवस्थापकांनी दिलेल्या माहितीनुसार, ८ व ९ ऑगस्ट रोजी नारळीपौर्णिमा व रक्षाबंधन निमित्त ६५,१७८ किमी अंतरावर वाहतूक करून ४२ लाख ६६ हजार रुपये व्यवसाय झाला  तर १२ ऑगस्ट रोजी अंगारकी संकष्टीसाठी गणपतीपुळे मार्गावर ७९२ किमी प्रवासातून ५६ हजार रुपये व्यवसाय झाला. एकूण ६५,९७० किमीच्या प्रवासातून ६५.५१ रुपये प्रति किमी उत्पन्न नोंदवले गेले असून एकूण प्रवासी संख्या ७८,८४६ इतकी होती.

बसेसची चांगली सोय व वेळेवर उपलब्धता यामुळे प्रवाशांनी समाधान व्यक्त केले. तसेच आगार प्रशासनाने माध्यमांद्वारे जादा वाहतूक माहिती पोहोचवल्याबद्दल वृत्तपत्रांचे आभार मानले.

ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA

घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

पुढे वाचा