ICHMH51NEWS.IN
9921600800

इमनपाच्या वतीने ध्वजारोहण संपन्न

👇बातमी ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

इमनपाच्या वतीने ध्वजारोहण संपन्न

इचलकरंजी
          इचलकरंजी महानगर पालिकेच्या वतीने भारतीय स्वातंत्र्याच्या दिनानिमित्त मुख्य ध्वजारोहण समारंभ आयुक्त तथा प्रशासक पल्लवी पाटील यांच्या शुभहस्ते आणि आमदार डॉ.राहुल आवाडे तसेच अति.आयुक्त सुषमा शिंदे, उपायुक्त नंदु परळकर, उपायुक्त अशोक कुंभार, उपायुक्त राहुल मर्ढेकर, उपायुक्त विद्या कदम सहा.आयुक्त विजय राजापुरे यांच्या प्रमुख उपस्थितीत राजाराम स्टेडियमवर  मोठ्या उत्साहात साजरा करणेत आला.
  त्याचबरोबर महानगरपालिकेच्या विविध विभागाकडून ध्वजारोहण सोहळा साजरा करण्यात येतो यामध्ये राजर्षी छत्रपती शाहू हायस्कूल येथे उपायुक्त विद्या कदम यांच्या हस्ते, बांधकाम विभागाच्या वतीने जुनी नगरपालिका इमारत उपायुक्त नंदू परळकर यांच्या हस्ते, आरोग्य विभागाच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर हॉस्पिटल येथे उपायुक्त अशोक कुंभार यांच्या हस्ते, पाणी पुरवठा विभागाच्या वतीने जलशुद्धीकरण केंद्र येथे सहा. आयुक्त विजय राजापुरे यांच्या हस्ते आणि वाहन विभाग येथे प्र.सहा. क्रीडा अधिकारी संजय कांबळे यांच्या हस्ते ध्वजारोहण सोहळा साजरा करण्यात आला.
            आजच्या ध्वजारोहण समारंभासाठी महानगर पालिकेच्या महाराष्ट्र सुरक्षा बलाचे सुरक्षा रक्षक, राजर्षी शाहू हायस्कूल, डि.के. ए. एस. सी. महाविद्यालय,आक्काताई रामगोंडा पाटील कन्या महाविद्यालय, गोविंदराव हायस्कूल, गंगामाई हायस्कूल, सरस्वती हायस्कूल, व्यंकटराव हायस्कूल, बापुजी साळुंखे हायस्कूल एन.सी.सी., एम.सी.सी.च्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.
      याप्रसंगी  आयुक्त पल्लवी पाटील यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन सन २०२५ या वर्षामध्ये  महानगरपालिका सेवेतून सेवानिवृत्त होत असलेल्या अधिकारी कर्मचारी यांना शुभेच्छा दिल्या तसेच ‘ हर घर तिरंगा’  उपक्रमा अंतर्गत इचलकरंजी शहरातील स्वातंत्र्य सैनिकांच्या वारसांचा आणि माजी सैनिकांचा सत्कार केला.
    या कार्यक्रमासाठी प्रा.संतोषी जावीर, प्रा. प्रमिला सुर्वे, प्रा.विनायक भोई,  प्रा. राहुल बूनांद्रे, प्रा. रोहित शिंगे, शाहू हायस्कूल मुख्याध्यापक शंकर पोवार, व्ही.एस.मुलाणी, सरस्वती हायस्कूलचे संजय परीट, जितेंद्र कुलकर्णी आदींचे मोलाचे सहकार्य लाभले.
          याप्रसंगी  पुंडलिकभाऊ जाधव, माजी उपनगराध्यक्ष तानाजी पोवार, प्रकाश मोरबाळे, माजी नगरसेवक सागर चाळके, अब्राहम आवळे, दिलीप मुथा, संतोष शेळके, दिपक  ढेरे माजी नगरसेविका सुनिता मोरबाळे यांचेसह वित्त व लेखा अधिकारी विकास खोलपे, मुख्य लेखा परीक्षक आरती खोत, शिक्षण अधिकारी बी.एम.कासार, शहर अभियंता महेंद्र क्षिरसागर, कार्यकारी अभियंता अभय शिरोलीकर, आरोग्य अधिकारी डॉ. सुनिलदत्त संगेवार, अग्निशमन अधिकारी सौरभ साळुंखे, शाखा अभियंता बाजीराव कांबळे,यांचे सह शहरातील स्वातंत्र्य सैनिकांचे वारस, माजी सैनिक,  महानगर पालिकेचे विभाग प्रमुख, शहरातील  विविध संस्थांचे प्रतिनिधी, महानगर पालिका निवृत्त अधिकारी कर्मचारी, नागरिक, विविध शाळा, महाविद्यालयाचे विद्यार्थ्यां मोठ्या संख्येने उपस्थित होते.
ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA

घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

पुढे वाचा