रवींद्रनाथ टागोर विद्यानिकेतन शाळेत भारतीय स्वातंत्र्य दिन उत्साहात संपन्न.
इचलकरंजी
रवींद्रनाथ टागोर विद्यानिकेतन मध्ये स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात संपन्न झाला. शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा प्रियंका शेटके व माजी शिक्षण समिती सभापती सुनीता मोरबाळे यांच्या हस्ते ध्वजपूजन झाले शाळेच्या मुख्याध्यापिका अलका शेलार यांच्या हस्ते आणि महानगरपालिका शिक्षण विभाग परिवेक्षक राजेंद्र घोडके यांच्या उपस्थितीत ध्वजारोहण झाले.
यानंतर इयत्ता पाचवी व आठवी शिष्यवृत्ती धारक विद्यार्थी तसेच ‘हर घर तिरंगा’ उपक्रमांतर्गत घेण्यात आलेल्या विविध स्पर्धेतील यशस्वी विद्यार्थ्यांचा व गतवर्षीच्या नवसाक्षरांचा प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला.
त्यानंतर विद्यार्थी गुणदर्शन कार्यक्रम सादर करणेत आला. याप्रसंगी हर घर तिरंगा मोहीमेच्या अनुषंगाने प्राप्त शासन आदेशा नुसार देशभक्तीपर गीतावर ८०० विद्यार्थ्यांची सामुदायिक कवायत संपन्न झाली.
यावेळी शाळा व्यवस्थापन समितीचे सर्व सदस्य, पालक,शिक्षक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800







