ICHMH51NEWS.IN
9921600800

श्रीनंदन मालपाणी यांना योगामध्ये दोन सुवर्णपदक – राष्ट्रीय स्पर्धेत निवड

👇बातमी ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

श्रीनंदन मालपाणी यांना योगामध्ये दोन सुवर्णपदक – राष्ट्रीय स्पर्धेत निवड-

व्हिडीओ-https://youtube.com/shorts/Gpu7fQGC0sw?si=j1SKikB_uGYFKPxl

 

इचलकरंजी :
इचलकरंजी शहरातील योगपटू श्रीनंदन मधुसूदन मालपाणी याने संगमनेर येथे झालेल्या योगा फेडरेशनच्या राज्यस्तरीय स्पर्धेत चमकदार कामगिरी करत दोन सुवर्णपदकांची कमाई केली आहे. फॉरवर्ड बेंड योगा आणि सुपाइन योगा या दोन्ही प्रकारात राज्यात प्रथम क्रमांक पटकावत श्रीनंदनने आपली योगकला सिध्द केली.
या यशाच्या जोरावर श्रीनंदनची विजयवाडा येथे होणाऱ्या राष्ट्रीय स्पर्धेसाठी महाराष्ट्र संघात निवड झाली असून राज्याचे प्रतिनिधित्व करण्याचा मान त्याला मिळाला आहे.
यापूर्वीही श्रीनंदनने योगात अनेक उल्लेखनीय कामगिरी केली आहे. जानेवारी महिन्यात झालेल्या शालेय राष्ट्रीय स्पर्धेत कलात्मक योगा प्रकारात संपूर्ण भारतात त्याने द्वितीय क्रमांक पटकावला होता. तसेच बिहारमध्ये झालेल्या खेलो इंडिया 2025 स्पर्धेत महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व केले होते.
सातव्या वर्षापासून योगाभ्यास सुरू केलेल्या श्रीनंदनने राज्यस्तरीय स्पर्धांमध्ये पदके जिंकून आतापर्यंत तब्बल १६ राष्ट्रीय स्पर्धांत महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व केले आहे. कोविड काळातही त्याने विविध संस्थांच्या माध्यमातून २००० हून अधिक विद्यार्थी व कुटुंबांपर्यंत ऑनलाइन योगाभ्यास पोहोचवला होता.
त्याच्या या यशामुळे इचलकरंजी शहरात त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव होत असून श्रीनंदनने या यशाचे श्रेय सोहम योग अकॅडमीचे राष्ट्रीय पंच योग गुरू निलेश कागिनकर  व संपूर्ण मालपाणी परिवार,मित्रपरिवार आणि हितचिंतक यांना दिले आहे.
ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA

घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

पुढे वाचा