इचलकरंजी महानगरपालिकेत सद्भावना दिन साजरा – माजी पंतप्रधान राजीव गांधी यांना अभिवादन
इचलकरंजी, दि. २० ऑगस्ट –
भारताचे माजी पंतप्रधान स्व. राजीव गांधी यांच्या जयंतीनिमित्त इचलकरंजी महानगरपालिकेत सद्भावना दिन साजरा करण्यात आला. या प्रसंगी त्यांच्या प्रतिमेस महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक पल्लवी पाटील यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
कार्यक्रमास उपायुक्त राहुल मर्ढेकर व उपायुक्त विद्या कदम प्रमुख उपस्थित होते. यावेळी उपस्थित अधिकारी व कर्मचारी यांनी सद्भावना प्रतिज्ञा घेतली.
या कार्यक्रमास मुख्य वित्त व लेखाधिकारी विकास खोलपे, सहायक आयुक्त विजय राजापुरे, समाज विकास अधिकारी सुनील शिंदे, माहिती व जनसंपर्क अधिकारी नितिन बनगे, क्रीडा अधिकारी संजय शेटे, धनंजय पळसुले, रामचंद्र कांबळे यांच्यासह अनेक अधिकारी, कर्मचारी व शिक्षक उपस्थित होते.
सद्भावना दिनाच्या औचित्याने राजीव गांधी यांच्या कार्याचा गौरव करत समाजात एकोपा, शांतता आणि प्रगतीचे मूल्य जोपासण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले.
माजी पंतप्रधान राजीव गांधी यांना अभिवादन करताना आयुक्त पल्लवी पाटील,उपायुक्त विद्या कदम,राहुल मर्ढेकर व इतर
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800







