‘वेध भरारीचे’ – आंतरराष्ट्रीय उद्योजक प्रशांत बोरा यांचे व्याख्यान इचलकरंजीत
इचलकरंजी:
इचलकरंजीचे सुपुत्र व आंतरराष्ट्रीय स्तरावर उद्योगविश्वात भक्कम स्थान निर्माण करणारे बोरा मल्टिक्रॉपचे सर्वेसर्वा प्रशांत प्रकाशजी बोरा यांचे ‘वेध भरारीचे’ या विषयावर व्याख्यान येथील श्रीमंत ना. बा. घोरपडे नाट्यगृहात शुक्रवार दि. २२ ऑगस्ट २०२५ रोजी सायंकाळी ५ वाजता आयोजित करण्यात आले आहे.
रोटरी क्लब ऑफ इचलकरंजी, जैन इंटरनॅशनल ट्रेड ऑर्गनायझेशन (जितो) परिवार, लायन्स क्लब ऑफ इचलकरंजी व महेश क्लब ऑफ इचलकरंजी यांच्या संयुक्त विद्यमाने या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे.
‘आंतरराष्ट्रीय व्यापारातील संधी, कार्यतत्परता व उद्योगविश्वातील नवसंकल्पना’ या विषयांवर बोरा मार्गदर्शन करणार असून, हे व्याख्यान शहर व परिसरातील उद्योजक, निर्यात करू इच्छिणारे तसेच व्यवसाय वृद्धीचे स्वप्न बाळगणाऱ्यांसाठी प्रेरणादायी ठरणार आहे.
प्रशांत बोरा यांचा अनुभव, आंतरराष्ट्रीय उद्योगविश्वातील दृष्टीकोन, उद्योजकतेच्या नव्या वाटा, निर्यात क्षेत्रातील संधी आणि जागतिक बाजारपेठेत यशस्वी होण्याचे मार्गदर्शन या व्याख्यानातून मिळणार आहे.
व्यवसायात भरारी घेण्याची इच्छा असलेले, नव्या कल्पनांना मूर्त स्वरूप द्यायची धडपड करणारे आणि जागतिक बाजारपेठेत पाऊल ठेवू इच्छिणारे सर्वांनी या व्याख्यानाला उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले आहे.
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800








