इचलकरंजी महानगरपालिकेच्या वतीने भगवान सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी यांना विनम्र अभिवादन
इचलकरंजी
इचलकरंजी महानगरपालिकेच्या वतीने आज सोमवार दि. २५ ऑगस्ट २०२५ रोजी भगवान सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी अवतारदिन जयंती (भाद्रपद शुक्ल द्वितीया तिथीनुसार) निमित्त त्यांच्या प्रतिमेस अतिरिक्त आयुक्त सुषमा शिंदे यांच्या हस्ते आणि उपायुक्त विद्या कदम यांच्या प्रमुख उपस्थितीत पुष्पहार अर्पण करून अभिवादन करणेत आले.
यावेळी सहा आयुक्त विजय राजापुरे, शिक्षण अधिकारी बी. एम. कुंभार, समाज विकास अधिकारी सुनील शिंदे, माहिती व जनसंपर्क अधिकारी नितिन बनगे, रामचंद्र कांबळे, गणेश शिंदे, सदाशिव जाधव, उमेश कांबळे, अजय सुतार, सुजाता डाफळे, श्रीमती देशमुख,अशोक कमते आदींसह महानगरपालिका अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.
चक्रधर स्वामी यांना अभिवादन करताना अति आयुक्त सुषमा शिंदे,उपायुक्त विद्या कदम व इतर
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800







