ICHMH51NEWS.IN
9921600800

रोटरी सेंट्रल एक्झिक्युटिव्ह प्रोबस क्लब इचलकरंजी, यांच्या वतीने आरोग्यदायी जीवनशैली या विषयावर वेलनेस सेंटरचे संचालक श्री अमित गाठ  यांचे मार्गदर्शनपर व्याख्यान संपन्न

👇बातमी ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

रोटरी सेंट्रल एक्झिक्युटिव्ह प्रोबस क्लब इचलकरंजी, यांच्या वतीने आरोग्यदायी जीवनशैली या विषयावर वेलनेस सेंटरचे संचालक श्री अमित गाठ  यांचे मार्गदर्शनपर व्याख्यान संपन्न.

        इचलकरंजी:
रोटरी भवन नाकोडा नगर येथे, सदरच्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थापक अध्यक्ष प्रकाशराव सातपुते  होते. मान्यवरांचे व उपस्थितांचे स्वागत सेक्रेटरी श्री किरण कटके यांनी केले, तर प्रास्ताविक करत असताना क्लबचे अध्यक्ष श्री सुनिल कोष्टी यांनी रोटरीच्या माध्यमातून भविष्यातील विविध उपक्रमाची माहिती दिली. ज्येष्ठ नागरिकांच्या साठी  आवश्यक असे आरोग्य शिबिरे व सहलीचे आयोजन करत असण्याचे त्यांनी सांगितले.
      याप्रसंगी प्रमुख पाहुणे वेलनेस सेंटरचे संचालक श्री अमित गाठ यांचा सत्कार श्री प्रकाशराव सातपुते यांनी केला, तर त्यांची ओळख सौ. सुजाता कोईक  यांनी करून दिली. श्रीयुत अमित गाठ यांनी आपल्या मार्गदर्शनामध्ये, सध्याच्या बदलत्या जीवनशैलीमुळे आरोग्याच्या अनेक समस्यांचा सामना सर्वांना करावा लागत असल्याचे सांगितले .अलीकडच्या बदललेली खान पानाची सवय ,फास्टफूड व धावपळीचे जीवन यामुळे माणसाचे स्वास्थ अधिक बिघडले असून प्रत्येकाने स्वयंशिस्त व आपल्या चुकीच्या सवयी बदलण्याची गरज आहे. पुरेशी झोप, समतोल आहार व वयोमानानुसार व्यायाम या गोष्टी जर अमलात आणल्या तर प्रत्येक व्यक्तीचे आरोग्य चांगले राहण्यास  मदत होईल असे त्यांनी सांगितले .यावेळी क्लबचे नवीन सभासद व ज्यांचे वाढ दिवस आहेत त्यांचा उपस्थित प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. संस्थापक अध्यक्ष श्री प्रकाशराव सातपुते यांनी अमित गाठ यांनी वेळोवेळी वेलनेस सेंटरच्या माध्यमातून केलेल्या कार्याचे कौतुक केले व त्यांचा लाभ गरजूंनी घ्यावा असे आवाहन केले.  आभाराचे  कार्य सह सेक्रेटरी सौ संगीता लडगे यांनी पार पाडले. या कार्यक्रमास खजिनदार जयश्री चौगुले, शिवबसू खोत, मोहनराव भिडे ,जुगल किशोर तिवारी, अजित कोईक, जयप्रकाश साळगावकर साहेब, काशिनाथ जगदाळे, अरुण केटकाळे, एम . तेग्गु, नीता दोडणावर,अशोक  पाटील, श्रीशैल बेलूर, अलका काटकर ,माधवी कुलकर्णी, सुरेखा मगदूम, संगीता पाटील, अरुणा कोरे, वैभव डोंगरे, बाबासाहेब पाटील, शालिनी जगदाळे, हेमंत कवठे, विजय हावळे, मामा होगाडे, कैलास दिवटे, बाबासाहेब हावळे ,निर्मला मोरे, एमजी लोंढे, गजानन शिरगुरे ,काशिनाथ टकले, सुधीर शहाणे, डीएम बिरादार, आनंदा मेटे, अनिल ज्वारे ,संजय चिखलगे, सदाशिव मेटे ,विश्वनाथ एकार, लक्ष्मण घंटा, शंकर लाखे, विजय बनसोडे, सर्जेराव घोरपडे, ज्ञानदेव मेटे, उज्वला होगाडे, आनंदी हजारे ,प्रमोद लाटणे, रमेश पाटील, एम के कांबळे, ज्योतीराम वरुटे, विना श्रेष्ठ, डेजी कुरणे, रामचंद्र निमनकर सर याचे सह क्लबचे मेंबर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
अमित गाठ यांचा सत्कार करताना प्रकाश सातपुते,सुनील कोष्टी व इतर
ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA

घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

पुढे वाचा