ए.आय.चा वापर डोळसपणे केला पाहिजे-समाजवादी प्रबोधिनी चर्चासत्र
इचलकरंजी :
कृत्रिम बुद्धिमत्ता अर्थात ए. आय. हे माहिती तंत्रज्ञानातील सध्याचे सर्वात महत्त्वाचे साधन बनले आहे. याचा विवेक बुद्धीने वापर केला तर ते मानव जातीच्या कल्याणासाठी वरदान ठरेल. परंतु AI चा वापर करत असताना मानवी मेंदूचा विकासाची प्रक्रिया थांबत नाही ना, विचार करण्याच्या नैसर्गिक क्षमतेचा ऱ्हास होत नाही ना, याची आपण काळजी घेतली पाहिजे.असे मत तरुण शिक्षक अभ्यासक देवदत्त कुंभार यांनी व्यक्त केले. ते समाजवादी प्रबोधिनीच्या साप्ताहिक चर्चासत्रात ” कृत्रिम बुद्धिमत्ता : शाप की वरदान ” समारोप करताना बोलत होते या चर्चासत्रात सर्वस्वी प्रसाद कुलकर्णी, दयानंद लिपारे ,देवदत्त कुंभार ,अशोक केसरकर, पांडुरंग पिसे ,प्रा.रमेश लवटे, रामचंद्र ठिकणे ,शकील मुल्ला, शहाजी धसते, मनोहर जोशी आदींनी सहभाग घेतला. प्रारंभी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते कॉ. मुकुंद वैद्य व धोंडीराम जावळे यांना आदरांजली वाहण्यात आली.
Advt
या चर्चासत्रातून असे मत पुढे आले की,माणसाचा मेंदू आणि त्याद्वारे विचार करण्याची क्षमता हे माणसाचे वेगळेपण राहिले आहे. अगदी अश्मयुगापासून ते आज अखेर या सामर्थ्याच्या जोरावरच माणसाने प्रगती साधली आहे. औद्योगिक क्रांतीनंतर मानवी विकासाला गती प्राप्त झाली होती. एकविसावे शतक हे माहिती तंत्रज्ञानाचे युग मानले जाते, या काळात मानवी विकासाची गती ही प्रचंड वाढली आहे. कृत्रिम बुद्धिमत्ता अर्थात ए.आय. चा वापर आपण डोळसपणे केला नाही तर नव्या ए.आय.गुलामगिरीची व्यवस्था निर्माण होईल. मेंदूच्या विकासाला चालना देणारे आणि विचार प्रक्रियेला चालना देणाऱ्या शिक्षण पद्धतीचा आपणास नव्याने स्वीकार करावा लागेल. तरच कृत्रिम बुद्धिमत्ता हे शाप न करता वरदान ठरेल.
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800







