ICHMH51NEWS.IN
9921600800

ॲनॉन फ्रेंड्स सर्कल , भाग्यश्री कॉलनी यांचा शाडू मातीचा भाग्यगणेश ! पर्यावरण_बाप्पा

👇बातमी ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

ॲनॉन फ्रेंड्स सर्कल , भाग्यश्री कॉलनी यांचा शाडू मातीचा भाग्यगणेश !

पर्यावरण_बाप्पा

इचलकरंजी
भाग्यश्री कॉलनी सार्वजनिक गणेशोत्सव स्थापना १९८२ सालची असून सुरवातीची काही वर्षे मंडळाने POP ची गणेश मूर्ती आणली पण लवकरच मंडळाच्या कार्यकर्त्यांना पर्यावरण व नदी प्रदूषण बाबत जाणीव झाल्यामुळे शाडू मातीचा बाप्पा आणायला सुरवात केली , अगदी १० फुटाची POP ची गणेश मूर्ती ते ३ फुटाची शाडू मातीची गणेश मूर्ती हा बदल वाखाणण्याजोगा आहे . गणेश आगमन मिरवणूक ही बैलगाडी मधून केली जाते , पारंपरिक वाद्यांचाच वापर केला जातो ,  सर्वांत महत्त्वाचे म्हणजे शाडू ची मूर्ती असूनही या मूर्ती चे विसर्जन नदीत न करता सार्वजनिक बागेतील कुंडात केले जाते , मंडळाच्या सर्व कार्यकर्त्यांच्या घरच्या गणेशमूर्तीही शाडू मातीच्या असतात व त्यांचे ही विसर्जन कुंडात केले जाते असा उपक्रम राबवणारे महाराष्ट्रातील एकमेव मंडळ असावे .
ॲनॉन फ्रेंड्स सर्कल गणेशोत्सव सोबतच नवरात्रोत्सव ही मोठ्या उत्साहात साजरा करत असते , देवीची मूर्ती  फायबर पासून बनवलेली कायमस्वरूपी असून तीचे विसर्जन केले जात नाही ,
ॲनॉन फ्रेंड्स सर्कल , वर्षभर इतर सामाजिक उपक्रम जसे की पंचगंगा नदी स्वच्छता , रामलिंग येथे प्लॅस्टिक निर्मूलन , वृक्षारोपण , रक्तदान , गरजू ना मदत असे उपक्रम राबवत असते , मंडळ गेली १२ वर्षे होळी सणाच्या वेळी शेणीदान हा उपक्रम राबवते पर्यावरणाच्या रक्षणासाठी होईल तेवढे प्रयत्न करत असते .
मंडळाचे अध्यक्ष श्री दिपक लाटणे यांच्या पुढाकाराने भाग्यश्री कॉलनीतील सर्व रहिवाशांच्या सहकार्याने विविध उपक्रम राबवत असते.
ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA

घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

पुढे वाचा