ICHMH51NEWS.IN
9921600800

इचलकरंजीत सोलर हायमास्ट पोल धोकादायक स्थितीत

👇बातमी ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

इचलकरंजीत सोलर हायमास्ट पोल धोकादायक स्थितीत

व्हिडीओ- https://youtu.be/e2EwesHrecg?si=93Gkrb_a9OdkLThg

 

इचलकरंजी :
शहरातील स्टेशन रोड लगत असलेल्या कॅबसन हॉटेल चौकात उभारलेला सोलर हायमास्ट पोल सध्या अत्यंत धोकादायक स्थितीत आढळून आला आहे. सदरचा पोल हलत असल्याने अपघाताची शक्यता वाढली असून परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

वाहतुकीची मोठी वर्दळ असलेल्या या चौकात रोज हजारो नागरिकांची ये-जा सुरू असते. अशावेळी हायमास्ट पोल कोसळण्याचा धोका असल्याने गंभीर दुर्घटना होऊ शकते. स्थानिक नागरिकांनी प्रशासनाचे लक्ष वेधत तातडीने उपाययोजना करण्याची मागणी केली आहे.

सदर प्रकरणी संबंधित विभागाने तत्काळ हायमास्टची समस्या सोडवावी अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. अन्यथा कोणताही अनर्थ घडल्यास प्रशासन जबाबदार राहील, असा इशाराही नागरिकांनी दिला आहे.

ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA

घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

पुढे वाचा