डी.के.ए.एस.सी महाविद्यालयाच्या आर्चरी खेळाडूंनी साधला अचूक निशाणा
इचलकरंजी
जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय कोल्हापूर व इचलकरंजी महानगरपालिका आयोजित शासकीय आर्चरी क्रीडा स्पर्धा डी के टी ई हायस्कूल नारायण मळा या ठिकाणी उत्साह पूर्ण वातावरणामध्ये संपन्न झाल्या.
या झालेल्या स्पर्धेमध्ये डी के ए एस सी महाविद्यालयाच्या आर्चरी खेळाडूंनी उत्कृष्ट कामगिरी करत अचूक नेम साधला. यामध्ये
1 )१७ वर्षाखालील (मुले) रिकर्व
अमेय कदम (प्रथम क्रमांक )
2 )१९ वर्षाखालील (मुले) कंपाऊंड
आर्यन सपकाळ (प्रथम क्रमांक)
3 )१९ वर्षाखालील (मुली) – रिकर्व
अंशिका वाईकर (प्रथम क्रमांक)
4 )१९ वर्षाखालील (मुले) रिकर्व
प्रशांत तुरंबेकर (द्वितीय क्रमांक)
यांनी केलेल्या उत्कृष्ट कामगिरीमुळे त्यांची विभागीय स्पर्धेसाठी निवड झाली.
Advt
खेळाडूंच्या या यशाबद्दल महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ एस के खाडे यांनी खेळाडूंचे अभिनंदन केले. खेळाडूंना महाविद्यालयाचे क्रीडा संचालक प्रा.विनायक भोई, प्रा. मुजफ्फर लगीवाले यांचे मार्गदर्शन लाभले. महाविद्यालयाचा प्राध्यापक स्टाफ, प्रशासकीय स्टाफ व विद्यार्थी विद्यार्थिनींनी खेळाडूंना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
फोटो-आर्चरी क्रीडा स्पर्धेत यश मिळवलेल्या खेळाडूंचा प्राचार्य एस के खाडे यांनी सन्मान केला
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800







