ICHMH51NEWS.IN
9921600800

झेडएलडी प्रकल्प इचलकरंजी स्मार्ट सिटीचा पाया ठरेल – खासदार धैर्यशील माने

👇बातमी ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

झेडएलडी प्रकल्प इचलकरंजी स्मार्ट सिटीचा पाया ठरेल – खासदार धैर्यशील माने

इचलकरंजी, –
पंचगंगा नदी प्रदूषणमुक्त करण्यासाठी इचलकरंजीत राबविण्यात येणारा ६०९.५८ कोटींचा झिरो लिक्विड डिस्चार्ज (झेडएलडी) प्रकल्प हा शहराच्या स्मार्ट सिटी संकल्पनेचा पाया ठरेल, असे मत खासदार धैर्यशील माने यांनी व्यक्त केले. मनपा सभागृहात झालेल्या आढावा बैठकीत ते बोलत होते.

बैठकीस आमदार राहुल आवाडे, माजी मंत्री प्रकाश आवाडे, माजी आमदार सुरेश हाळवणकर, आयुक्त पल्लवी पाटील, अतिरिक्त आयुक्त सुषमा शिंदे,प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अधिकारी,शासकीय अधिकारी, प्रोसेस सायझिंग असोसिएशनचे पदाधिकारी,शिवसेना जिल्हाप्रमुख रवींद्र माने,शहरप्रमुख भाऊसो आवळे तसेच उद्योजक उपस्थित होते.

या प्रकल्पाअंतर्गत इचलकरंजी येथे १३.८५ दशलक्ष लिटर, लक्ष्मी औद्योगिक वसाहतीत ४.७ दशलक्ष लिटर आणि यड्राव येथे ४.७ दशलक्ष लिटर क्षमतेची सांडपाणी शुद्धीकरण केंद्रे उभारण्यात येणार आहेत. प्रकल्पासाठी जागा निश्चित करण्यात आली असून पुढील २७ महिन्यांत काम पूर्ण होणार असल्याचे एमआयडीसीच्या अधिकार्‍यांनी स्पष्ट केले. शासनाचा १०० टक्के निधी मिळालेला हा भारतातील पहिलाच झेडएलडी प्रकल्प असल्याने याकडे सर्वांचे लक्ष आहे.

मनपा सभागृहात झालेल्या चर्चेत सांडपाणी प्रक्रिया, पुनर्वापर, तसेच उद्योजकांना भेडसावणाऱ्या अडचणींवर उपाययोजना यावर सविस्तर चर्चा झाली. उद्योग क्षेत्राला स्वतंत्र व्यवस्था देण्यासाठी प्रशासन सकारात्मक असून, विद्यमान प्रकल्पामध्येच स्वतंत्र कक्ष उभारण्याची तयारी दर्शविण्यात आली आहे.

बैठकीदरम्यान माजी आ. सुरेश हाळवणकर यांनी “रस्ते खुदाई करताना महापालिकेला कल्पना द्यावी”, तर माजी मंत्री प्रकाश आवाडे यांनी “प्रकल्प राबविताना प्रदूषण होणार नाही याची दक्षता घ्यावी” असे आवाहन केले. आ. राहुल आवाडे यांनी “झेडएलडीमुळे इचलकरंजीवरील प्रदूषणाचा ठपका मोठ्या प्रमाणात कमी होणार आहे” असे नमूद केले.

इचलकरंजीला ग्रीन सिटी व स्मार्ट सिटी बनवणार-खा.माने

खासदार माने यांनी “इचलकरंजीला स्मार्ट सिटी व ग्रीन सिटी बनविण्यासाठी आवश्यक निधी उपलब्ध करून देण्याची जबाबदारी आम्हा लोकप्रतिनिधींची आहे. प्रशासनाने उपाययोजना राबवल्यास शासन दरबारी पाठपुरावा करू,”व इचलकरंजीला ग्रीन सिटी व स्मार्ट सिटी करू असेही स्पष्ट केले.

इचलकरंजी शहरास एमआयडीसीचा दर्जा-

घराघरात यंत्रमाग उद्योग असल्याने त्यानुसार रस्ते व इतर भौतिक सुविधा मिळण्यासाठी इचलकरंजी शहराचा एमआयडीसी दर्जा मिळवुन विकास साधणार-

खा.धैर्यशील माने.

फोटो- झेडएलडी प्रकल्प आढावा बैठकीत खा. धैर्यशील माने, आ. राहुल आवाडे, प्रकाश आवाडे, सुरेश हाळवणकर, आयुक्त पल्लवी पाटील आदी मान्यवर.

ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA

घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

पुढे वाचा