इचलकरंजीत पोलीस महानिरीक्षकांचा दौरा,गणेशोत्सव नियोजनासंदर्भात शहापूर पोलीस स्टेशनमध्ये बैठक
इचलकरंजी :
गणेशोत्सव सणाच्या पार्श्वभूमीवर कोल्हापूर परिक्षेत्राचे पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी यांनी इचलकरंजीला भेट देवून शहरातील सुरक्षा व कायदा सुव्यवस्था व्यवस्थापनाची पाहणी केली.
यावेळी योगेश कुमार गुप्ता पोलीस अधीक्षक कोल्हापूर,अण्णासाहेब जाधव अपर पोलीस अधीक्षक गडहिंग्लज विभाग,विक्रांत गायकवाड इचलकरंजी उपविभागीय पोलीस अधिकारी, जयसिंगपूर उपविभागीय पोलीस अधिकारी तसेच इचलकरंजी विभागातील सर्व पोलीस ठाण्यांचे प्रभारी अधिकारी उपस्थित होते. शहापूर पोलीस स्टेशनमध्ये झालेल्या बैठकीत गतवर्षी गणेशोत्सव काळात घडलेल्या गुन्ह्यांचा आढावा घेण्यात आला. संभाव्य घटनांबाबत चर्चा करून प्रतिबंधक उपाययोजनांवर मार्गदर्शन करण्यात आले.
महानिरीक्षकांनी घरगुती तसेच सार्वजनिक गणेश विसर्जनाच्या अनुषंगाने विशेष खबरदारी घेण्याच्या सूचना दिल्या. त्यांनी इचलकरंजी शहरातील काही प्रमुख गणेश मंडळांना प्रत्यक्ष भेट देऊन विसर्जन मार्गाची पाहणी केली. तसेच नदी घाटावर जाऊन तेथील तयारीचीही तपासणी केली.
गणेशोत्सव काळात नागरिकांच्या सुरक्षेसाठी पोलीस प्रशासन सज्ज असून शिस्तबद्ध व शांततेत उत्सव पार पडावा, यासाठी आवश्यक ती सर्व खबरदारी घेण्यात येईल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.
शहापूर पोलीस ठाण्यात पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी यांचे जिल्हा पोलीस प्रमुख योगेश कुमार गुप्ता यांनी स्वागत केले.
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800







