ICHMH51NEWS.IN
9921600800

इचलकरंजीत पर्यावरण पुरक गणेश विसर्जन उत्साहात.११,३५५ मुर्ती विसर्जित तर १५ हजार किलो निर्माल्य संकलन.

👇बातमी ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

इचलकरंजीत पर्यावरण पुरक गणेश विसर्जन उत्साहात.११,३५५ मुर्ती विसर्जित तर १५ हजार किलो निर्माल्य संकलन.

इचलकरंजी :
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर घरगुती गणेश मूर्तींचे विसर्जन आज शहरातील विविध कृत्रिम विसर्जन कुंड, नदी घाट तसेच शहापूर खण येथे भक्तीमय वातावरणात संपन्न झाले. सकाळी ७ पासून सुरू झालेला हा सोहळा दुपारपर्यंत सुरू होता.
महानगरपालिकेने उभारलेल्या १ ते ५२ कृत्रिम विसर्जन कुंडांमध्ये तब्बल ७६२० गणेश मूर्ती विसर्जित झाल्या. यावेळी अंदाजे ९७३१ किलो निर्माल्य संकलित करण्यात आले.
नदी घाटावरील कृत्रिम तलावात १६३ मूर्ती विसर्जित होऊन सुमारे ९२३ किलो निर्माल्य जमा झाले. शहापूर खण येथे ३३५४ गणेश मूर्तींचे विसर्जन करण्यात आले तर ४११३ किलो निर्माल्य गोळा करण्यात आले. तसेच स्टार नगर विहिरीत २१८ मूर्ती विसर्जित झाल्या व ५०० किलो निर्माल्य संकलित झाले.
अशा प्रकारे आजपर्यंत शहरात एकूण ११,३५५ गणेश मूर्तींचे विसर्जन पार पडले असून १५,२६७ किलो निर्माल्य संकलन करण्यात आले आहे.
नगरपालिका प्रशासन, पोलिस यंत्रणा व स्वयंसेवी संस्था यांच्या प्रयत्नांमुळे विसर्जन सोहळा सुरळीत व पर्यावरणपूरक पद्धतीने पार पडला
ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA

घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

पुढे वाचा