ICHMH51NEWS.IN
9921600800

GST वर्गवारीत बदल : इचलकरंजी पॉवरलुम असोसिएशनने निर्णयाचे स्वागत

👇बातमी ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

GST वर्गवारीत बदल : इचलकरंजी पॉवरलुम असोसिएशनने निर्णयाचे स्वागत

इचलकरंजी :
भारत सरकारने जीएसटी (GST) मधील वर्गवारी कमी करून आता फक्त दोनच दर — ५ टक्के व १८ टक्के ठेवण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. या निर्णयाचे दि इचलकरंजी पॉवरलुम असोसिएशनच्या वतीने स्वागत करण्यात आले आहे.

यापूर्वी जीएसटीमध्ये ५, १२, १८ व २८ टक्के अशी चार वर्गवारी होती. आता केवळ दोन वर्गवारी ठेवल्याने वस्त्रोद्योग व व्यापार क्षेत्रात सकारात्मकतेचे वातावरण निर्माण झाले आहे. मानवनिर्मीत धागा व विविध फॅन्सी सुतधाग्यावरचा १२% जीएसटी ५% वर आला आहे, तसेच तयार कपड्यांवरील जीएसटीही १८% वरून ५% होणार आहे. या बदलामुळे उत्पादन खर्च कमी होऊन तयार कपडे, पॉलिस्टर कापड, फॅन्सी कापड स्वस्त होणार आहेत. परिणामी, ग्राहकांना कपडे स्वस्त मिळतील तसेच निर्यातीतही वाढ होण्याची अपेक्षा आहे.

याशिवाय जीएसटी परतावा काही आठवड्यांत देण्याच्या निर्णयामुळे उद्योजकांना खेळते भांडवल उपलब्ध होईल, अशी अपेक्षा असोसिएशनचे अध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केली.

दरम्यान, अमेरिकेने भारतीय कापडांवर ५०% टॅरिफ (आयात शुल्क) लावल्याने निर्यातीत अडचणी निर्माण झाल्या आहेत. या संदर्भात इचलकरंजी पॉवरलुम असोसिएशनने केंद्र सरकारकडे उपाययोजना सुचवल्या आहेत. त्यामध्ये देशांतर्गत व्यापार वाढीसाठी बांगलादेश, व्हिएतनाम, नेपाळ येथून होणाऱ्या आयातीवर शुल्क वाढवणे, लहान उत्पादकांना सहकार्य करणे, बँक व्याजदरात सवलत देणे, तसेच भारतीय दुतावासांमार्फत परदेशी बाजारपेठेत मार्केटिंगसाठी मदत करणे या मुद्द्यांचा समावेश आहे.

असोसिएशनने ‘आत्मनिर्भर भारत’ व ‘मेक इन इंडिया’ अंतर्गत भारतीय कापड खरेदीसाठी जनजागृती मोहिमा राबविण्याचेही आवाहन केले आहे. या निर्णयामुळे लघु, सूक्ष्म व मध्यम (MSME) उद्योगांना चालना मिळेल व चांगले दिवस येतील, असा विश्वास निवेदनात व्यक्त करण्यात आला आहे.

ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA

घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

पुढे वाचा