वृत्तपत्रपत्रलेखक संघाचा २८ वा वर्धापनदिन २१ सप्टेंबर रोजी साजरा होणार,जनजागृती पुरस्काराचे माजी कुलगुरू माणिकराव साळुंखे यांच्या हस्ते वितरण.
इचलकरंजी
वृत्तपत्रपत्रलेखक संघाचा २८वा वर्धापनदिन रविवार २१ सप्टेंबर २०२५ रोजी समाजवादी प्रबोधिनी येथें सायंकाळी ५.३० वाजता साजरा करण्यात येणार असल्याची माहिती अध्यक्ष पांडुरंग पिसे यांनी दिली.कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक ज्येष्ठ साहित्यिक,शिवाजी विद्यापीठाचे माजी कुलगुरू माणिकराव साळुंखे असणार आहेत.२८ व्या वर्धापनदिनाच्या निमित्ताने नागरी समस्यांसाठी सोशल मिडियाद्वारे जनजागृती करणाऱ्या ४ जणांना पुरस्कार देऊन गौरवण्यात येणार आहे.तरी सदर कार्यक्रमास शहरवासियांनी उपस्थित रहावे असे आवाहन संघटनेतर्फे करण्यात आले आहे.
पुरस्कार प्राप्त श्री नामदेव तुकाराम पाटील,मु.पो.सरोळी ता आजरा जिल्हा कोल्हापूर, गजानन भिमराव खोत मु.पो.तारदाळ,माधुरी नंदकुमार मेस्त्री मु.पो. निपाणी,शितल भाऊसाहेब मगदुम,इचलकरंजी यांचा समावेश आहे.
संघटनेकडे प्राप्त प्रस्तावातून या ४ उत्कृष्ट प्रस्तावांची जनजागृती पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे.
वृत्तपत्र पत्रलेखक संघटनेची महत्वपूर्ण बैठक नुकतीच समाजवादी प्रबोधिनी, इंडस्ट्रियल इस्टेट येथे पार पडली.या बैठकीत पुरस्काराची निवड करून घोषणा करण्यात आली.सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र असे पुरस्काराचे स्वरूप असणार आहे.सदर बैठकीस ज्येष्ठ मार्गदर्शक प्रसाद कुलकर्णी,अध्यक्ष पांडुरंग पिसे,सचिव मनोहर जोशी,विनोद जाधव,दिपक पंडित,बाळासाहेब नरशेट्टी, रमेश सुतार,संजय भस्मे,अभिजित पटवा व पत्रलेखक उपस्थित होते
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800







