ICHMH51NEWS.IN
9921600800

आपटे वाचन मंदिरातर्फे आंतरमहाविद्यालयीन वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन

👇बातमी ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

आपटे वाचन मंदिरातर्फे आंतरमहाविद्यालयीन वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन

इचलकरंजी:

शतकोत्तर सुवर्णमहोत्सवी आपटे वाचन मंदिराच्या वतीने लोकमान्य टिळक पुण्यतिथीनिमित्त साहित्य सम्राट न. चि. केळकर आंतरमहाविद्यालयीन वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेत सहभागी होऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांनी आपली नावे प्राचार्यांच्या शिफारशीसह व निवडलेल्या विषयासह बुधवार दि. १७ सप्टेंबर २०२५ पूर्वी आपटे वाचन मंदिर येथे पाठवावीत. प्रत्येक स्पर्धकासाठी प्रवेश फी रु. २०/- निश्चित करण्यात आली आहे. ही स्पर्धा शनिवार दि. २० सप्टेंबर २०२५ रोजी सकाळी ९ वाजता आपटे वाचन मंदिराच्या बजाज सभागृहात होणार असून स्पर्धा संपताच बक्षीस वितरण समारंभ पार पडेल. स्पर्धकांना सात मिनिटे मराठी भाषेत बोलण्याची संधी मिळणार असून विषय पुढीलप्रमाणे असतील – १) अपघात व्यवस्थापन आणि आपली भूमिका, २) मला समजलेले लोकमान्य टिळक, ३) वैद्यकीय क्षेत्राचे बदलते स्वरूप, ४) अभिजात मराठी भाषा आणि आव्हाने, ५) शैक्षणिक गुण – गुणवत्ता आणि पालक. स्पर्धेसाठी पहिले बक्षीस रु. ७५००/- रोख, प्रशस्तीपत्र व फिरते लोकमान्य टिळक स्मृती चिन्ह, दुसरे बक्षीस रु. ५०००/- रोख व प्रशस्तीपत्र, तिसरे बक्षीस रु. ३५००/- रोख व प्रशस्तीपत्र तर उत्तेजनार्थ दोन बक्षिसे प्रत्येकी रु. २०००/- रोख व प्रशस्तीपत्र अशी ठेवण्यात आली आहेत. अधिक माहितीसाठी कार्यवाह, आपटे वाचन मंदिर, राजवाडा चौक, इचलकरंजी, जि. कोल्हापूर यांच्याशी संपर्क साधावा. (फोन – ०२३०–२४२११६७, मो. ९१७५६३६३५७

ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA

घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

पुढे वाचा