धोकादायक सारण गटारीकडे बांधकाम विभागाचे दुर्लक्ष. व्हिडीओ
https://youtube.com/shorts/4ZD6BOmo0_c?si=y0yuCPXrIoZMBJKF
इचलकरंजी:
हु आण्णाराम गोंडा शाळेजवळील डॉ. शिखरे दवाखाना ते डी.बी. कॉर्नर चौक परिसरातील सारण गटार दिवसेंदिवस धोकादायक बनत चालले आहे. गटाराची अवस्था इतकी गंभीर आहे की तेथे मुले अथवा वाहने थेट आत कोसळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
आरोग्य विभागाचे कर्मचारी जीव मुठीत धरून येथे साफसफाईचे काम करत असल्याचे चित्र दिसत आहे. बांधकाम विभागाकडे वारंवार तक्रारी व रिपोर्ट देऊन सुद्धा कोणतीही दखल घेतली जात नाही, अशी नागरिकांची नाराजी आहे.
नागरिकांचा सवाल आहे की, “बांधकाम विभाग नेमका करतो तरी काय?”
सदर भागातील गटाराची तातडीने दुरुस्ती न झाल्यास एखादी दुर्घटना घडल्यास बांधकाम विभाग जबाबदार राहील, असा इशारा नागरिकांनी दिला आहे.
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800







