गोविंदराव ज्युनिअर कॉलेजचा श्रेणिक सदानंद दलवाई विभागीय नेमबाजी स्पर्धेसाठी निवड
इचलकरंजी:
जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, कोल्हापूर व इचलकरंजी महानगरपालिका आयोजित १७ वर्षाखालील शालेय शासकीय नेमबाजी स्पर्धा नुकत्याच संपन्न झाल्या. या स्पर्धेत गोविंदराव ज्युनिअर कॉलेजचा विद्यार्थी श्रेणिक सदानंद दलवाई (इयत्ता ११ वी विज्ञान) याने १० मीटर एअर पिस्टल नेमबाजी (रायफल शूटिंग) प्रकारात सुवर्णपदक पटकावले. त्यांच्या या उल्लेखनीय कामगिरीमुळे त्यांची कोल्हापूर येथे होणाऱ्या विभागीय नेमबाजी (रायफल शूटिंग) स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
श्रेणिक दलवाई हे गांधीनगर येथील ड्रीम ओलंपियन नेमबाजी प्रशिक्षण केंद्र, निगडेवाडी, कोल्हापूर येथे आंतरराष्ट्रीय नेमबाज प्रशिक्षक अनुराधा महादेव खुडे यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करतात. तसेच त्यांना समीर मुलानी यांचे प्रोत्साहन लाभले आहे. त्यांच्या या यशामागे आई ध्रुवती सदानंद दलवाई व वडील इचलकरंजी नगरपालिकेचे माजी नगरसेवक सदानंद दलवाई यांचेही सहकार्य लाभले आहे.
या यशाबद्दल श्री. ना.बा. एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष मा. श्री. श्रीनिवास बोहरा शेठजी, चेअरमन कृष्णा बोहरा शेठजी, व्हाईस चेअरमन मा. श्री. उदय लोखंडे,ऑनररी सेक्रेटरी बाबासाहेब वडिंगे, ट्रेझरर महेश बांदवलकर, स्कूल कमिटी चेअरमन लक्ष्मीकांत पटेल या पदाधिकाऱ्यांनी त्याचे कौतुक केले व अभिनंदन केले.
तसेच प्रशालेचे मुख्याध्यापक श्री. बी.पी. कवटगे, उपप्राचार्य श्री. एस.पी. गुरव यांनीही श्रेणिकच्या कामगिरीचे अभिनंदन केले. या खेळाडूला ज्युनिअर कॉलेजचे क्रीडा प्रमुख प्रा. अमित कागले यांचे विशेष मार्गदर्शन लाभले.
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800







