इचलकरंजी महानगरपालिकेची कारवाई : डॉ. बाबासाहेब आंबेडकर हॉस्पिटल परिसरातील अतिक्रमण हटविले
इचलकरंजी (दि. ११) – इचलकरंजी महानगरपालिकेच्या मालकीच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर हॉस्पिटल कंपौंडलगत असलेले अनधिकृत अतिक्रमण आज (गुरुवार, दि. ११ सप्टेंबर) हटविण्यात आले. ही कारवाई आयुक्त तथा प्रशासक पल्लवी पाटील यांच्या आदेशानुसार उपायुक्त नंदू परळकर आणि सहा. आयुक्त विजय राजापुरे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
कारवाईदरम्यान अतिक्रमणधारक इरफान रहमान शेख यांनी महानगरपालिका अधिकाऱ्यांवर धावून जाण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात आली असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले.
या मोहिमेत मिळकत विभाग अधीक्षक श्रीकांत पाटील, वरिष्ठ लिपिक सदाशिव गोनुगडे, लिपिक राजश्री कांबळे, कोर्ट विभागाचे वरिष्ठ लिपिक कृष्णा आवळे, अतिक्रमण विभाग प्रमुख सुभाष आवळे यांच्यासह मनपा अधिकारी व कर्मचारी सहभागी झाले होते.
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800








