जिल्हास्तरीय खो खो स्पर्धेत श्रीमंत गंगामाई गर्ल्स हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजचे तिहेरी यश
इचलकरंजी :
जिल्हा क्रीडा कार्यालय, कोल्हापूर व इचलकरंजी महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित शालेय शासकीय जिल्हास्तरीय खो खो स्पर्धा मंगळवार, ९ सप्टेंबर २०२५ रोजी इलेव्हन क्रीडा मंडळ येथे पार पडल्या.
या स्पर्धेत श्रीमंत गंगामाई गर्ल्स हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजच्या १४, १७ व १९ वर्षाखालील तिन्ही गटातील संघांनी प्रथम क्रमांक पटकावून तिहेरी यश संपादन केले. या विजयानंतर सर्व तिन्ही संघांची विभागीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
या उल्लेखनीय कामगिरीबद्दल श्री ना. बा. एज्युकेशन सोसायटीचे प्रेसिडेंट मा. श्रीनिवास बोहरा, चेअरमन कृष्णा बोहरा, व्हाईस चेअरमन श्री उदय लोखंडे, ट्रेझरर श्री महेश बांदवलकरसो, मानद सचिव श्री बाबासो वडिंगे साहेब, स्कूल कमिटी चेअरमन श्री मारोतराव निमणकर साहेब तसेच संस्थेचे सर्व पदाधिकारी व विश्वस्त यांनी संघांचे कौतुक केले.
प्रशालेच्या मुख्याध्यापिका ए. एस. काजी मॅडम, पर्यवेक्षक एस. एस. कोळी, सौ. व्ही. एस. लोटके, ज्येष्ठ शिक्षक डी. डी. कोळी यांनी विजयी संघांचे अभिनंदन केले.
खो खो खेळाचे प्रशिक्षक व क्रीडाशिक्षक कृष्णात पाटील यांनी खेळाडूंना प्रशिक्षित केले, तर जिमखाना प्रमुख बी. एस. माने यांचे मार्गदर्शन लाभले.
विजेत्या खेळाडु संघासमवेत पदाधिकारी व शिक्षक
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800







