ICHMH51NEWS.IN
9921600800

हिंदूंनी भाषावाद, प्रांतवाद आणि उच्च-निच्च या ऐवजी एकजुटी ने शत्रूशी मुकाबला करावा : खट्टर यांचे आवाहन.

👇बातमी ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

हिंदूंनी भाषावाद, प्रांतवाद आणि उच्च-निच्च या ऐवजी एकजुटी ने शत्रूशी मुकाबला करावा : खट्टर यांचे आवाहन.

इचलकरंजी-
सनातनी हिंदू धर्मास टार्गेट करून धर्म संपविला जाण्याच्या धोक्या पासून सावधान राहून उच्च निच्च, भाषा-प्रांत अशा भांडणा ऐवजी हिंदूची एकजूट भक्कम करा असे आवाहन सनातन महासंघाचे संस्थापक गौतम खट्टर यानी येथें केले.
 शिवराणा युथ फोर्स यांच्या वतीने येथील श्रीमंत घोरपडे नाट्यगृहात खट्टर यांचे, “आदी अनादी अनंत सनातन” या विषयावर व्याख्यान आयोजित केले होते.
खट्टर म्हणाले, काही हिंदूनी हिंदुतील काही लोकांवर अन्याय केला. पण अशा एका समाजा तील भीमराव आंबेडकर यांनी आपल्या गुणवत्तेवर मोठे यश मिळवले त्यांना कोल्हापूर च्या छ.शाहू महाराजांनी मोठी मदत केली. भारता तील कोणत्याही महापुरुषा पेक्षा डॉ. आंबेडकर यांचे पुतळे जादा आहेत. सनातन  मध्ये जो गुणी त्याला उच्च पदाचा सन्मान आहे. अनेक ऋषी मुनीचा जन्म ब्राह्मण कुळात झाला नाही. पण त्यांनी श्रेष्ठत्व मिळविले आज त्याची पूजा होते. प्रभू राम क्षत्रिय तर  रावण ब्राह्मण होता. तरीही रामाची पूजा होते. हा इतिहास आहे.
Advt
छ.शिवाजी महाराज छ. संभाजी महाराज हे हिंदूत्वा वर ठाम होते. अशी उदाहरणे देत त्यांनी हिंदूचे धर्मातरण, करण्याचे डाव चालू असल्याचा आरोप केला.आतंकवादकट्टर जातीवाद,  लव्हजिहाद व डाव्या विचाराच्या लोकांशी  लढायचे आहे.त्याची तयारी करा काही जण हिंदू म्हणवतात आणि हिंदी भाषिक म्हणून मारहाण करतात. हेचुक आहे. आपण देशासाठी कार्य करणाऱ्या छ. शिवाजीराजें, छ. संभाजीराजें, सुभाषचंद्र बोस, भगतसिग, तसेच डॉ. भीमराव आंबेडकर यांना जाती मध्ये वाटू नये सर्व हिंदू अ
एक आहेत. आपसात भांडण तंटे थांबविले पाहिजेत.
गणेश उत्सवात नाचणे हे हिंदुत्व नाही. हे त्यांनी स्पष्ट केले. गणेश ही देवता शक्ती बुद्धीची देवता आहे. आपल्या मंदिरात ध्यान धारणे सह चिंतन आणि चर्चा व्हावी. महिलांनी दांडिया खेळण्या ऐवजी लाठी काठी चालविण्यास शिकावे, भ. शंकर हे आपले प्रेरणा स्थान आहे.तसेच सनातन हिंदूधर्म हा विज्ञान वादी आहे. शास्त्रज्ञ केवळ हिंदू ग्रंथाचा अभ्यास करतात असे आवर्जून सांगितले.
खट्टर यांनी हजरत बाल दर्गा येथील अशोक चक्र तोडफोडी वर जिहादीना विचारले जात नाही. महाराष्ट्रात मशीदीतून अरबी मधुन शब्द येतात त्यावर महाराष्ट्रात आक्षेप घेतला जात नाही आदी प्रश्नही उपस्थित केले.संविधान वर केवळ राम असे लिहिणाऱ्या राम मनोहर सिन्हा- जबलपूर यांचाही उल्लेख केला. श्रीकृष्ण जन्म भूमी यावर आपले परखड मत मांडले. शेवटी आभार अरविद कुलकर्णी यांनी मानले. यावेळी संघटनेचे अध्यक्ष व कार्यकर्ते तसेच नागरिक मोठ्या संख्येने हजर होते.

आदि अनादी अनंत सनातन व्याख्यानात बोलताना गौतम खट्टर 

ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA

घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

पुढे वाचा