ICHMH51NEWS.IN
9921600800

सकल जैन समाजाच्या वतीने अरिहंत व्याख्यानमालेचे आयोजन

👇बातमी ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

सकल जैन समाजाच्या वतीने अरिहंत व्याख्यानमालेचे आयोजन

इचलकरंजी

सकल दिगंबर जैन समाज, लायन्स क्लब ऑफ इचलकरंजी व रोटरी क्लब ऑफ इचलकरंजी सेंट्रल यांच्या संयुक्त संयोजनातून ‘अरिहंत व्याख्यान माला २०२५’ दि. १७, १८ व १९ सप्टेंबर २०२५ रोजी संपन्न होत आहे. जैन समाजाच्या ‘पर्युषण पर्व’ नंतर गेली ८ वर्षे असे आयोजन इचलकरंजीतील दिगंबर जैन समाजाची सर्व मंदीरे व भ.महावीर जयंती उत्सव मंडळ यांच्या वतीने केले जात आहे.

Advt

यावर्षी बुधवार दि. १७ रोजी बीडचे श्री. राहुल गिरी यांचे ‘जैन विश्वकल्याणाची समृद्ध जीवनपद्धती’ या विषयावर व्याख्यान होणार आहे. तर गुरुवार दि. १८ रोजी रेंदाळच्या डॉ.सौ. मनीषा भोजकर यांचे ‘आनंदी आणि तणावमुक्त जीवन’ या विषयावर व्याख्यान होईल. आणि शुक्रवार दि. १९ रोजी पन्हाळ्याचे महेंद्र कुलकर्णी यांचे ‘संवाद हरलेले कुटुंब’ या विषयावर व्याख्यान होईल. ही व्याख्यानमाला दररोज सायंकाळी ७ वा. लायन्स क्लब, ब्लड बँक, दाते मळा, इचलकरंजी येथे होणार आहे.

 

सदरच्या व्याख्यानमालेस श्री आदिनाथ को-ऑप बँक लि., सन्मती सहकारी बँक लि., श्री वर्धमान नागरी सहकारी पत संस्था मर्या., कल्लाप्पाण्णा आवाडे इचलकरंजी जनता सहकारी बँक लि., चौगुले स्विट मार्ट अँड डेअरी, श्री लक्ष्मी सहकारी औद्योगिक वसाहत लि., व माणिक हार्डवेअर प्रा.लि. यांचे प्रायोजकत्व लाभलेले आहे.

 

तरी या वैचारीक प्रबोधनाचा सर्व नागरिक बंधू भगिनींनी उपस्थित राहून लाभ घ्यावा असे आवाहन सुरेश रोजे, तीर्थंकर माणगांवे, चंद्रकांत पाटील, संजय मगदूम, मोहन चौगुले, विजय गिरमल व अनिल बमन्नावर यांनी केले आहे.

ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA

घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

पुढे वाचा