आंतरभारती विद्यालय, इचलकरंजीकडून टिकली प्रकरणी स्पष्टीकरण
इचलकरंजी :
आंतरभारती शिक्षण मंडळ संचलित आंतरभारती विद्यालय, इचलकरंजीने “विद्यार्थिनींना टिकली लावण्यास अटकाव” या संदर्भातील काही वृत्तपत्रे व डिजिटल माध्यमांतून प्रसारित झालेल्या बातमीचे खंडन केले आहे. सदर बातमी चुकीची व खोटी असून शाळेच्या प्रतिमेला धक्का पोहोचवणारी आहे, असे स्पष्ट करण्यात आले आहे.
विद्यालयाच्या मुख्याध्यापिका यांनी दिलेल्या निवेदनात सांगितले की, विद्यार्थिनींना टिकली लावण्याबाबत शाळा व्यवस्थापक, मुख्याध्यापिका किंवा शिक्षकांनी कधीही मनाई केलेली नाही. शाळेत धर्मनिरपेक्ष व शिस्तबद्ध वातावरण जपले जाते. विद्यार्थ्यांवर नकारात्मक परिणाम होऊ नये म्हणून शाळा व्यवस्थापन, शिक्षक व पालक यांच्यात सुसंवाद ठेवला जात आहे. त्यामुळे अशा प्रकारची चुकीची बातमी प्रसिद्ध करून गैरसमज निर्माण करू नये, अशी विनंती त्यांनी केली.
दरम्यान, गजानन मनोहरराव महाजन यांनीही शाळेला भेट देऊन सदर बातमी चुकीची असल्याचे सांगितले. त्यांनी स्पष्ट केले की, संस्थेचे संचालक, व्यवस्थापक किंवा मुख्याध्यापिका यांनी कधीही अशा प्रकारचा नियम केलेला नाही. आंतरभारती संस्था ही साने गुरुजींच्या आदर्शावर चालणारी, समाजहित चिंतन करणारी व विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी कार्यरत असलेली संस्था आहे. चुकीच्या बातमीमुळे निर्माण झालेला गैरसमज दूर व्हावा, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800







