पांडुरंग म्हातुकडे यांची भाजपा जेष्ठ कार्यकर्ता आघाडी जिल्हाध्यपदी निवड
इचलकरंजी ता.
इचलकरंजी येथील भारतीय जनता पाटीचे जेष्ठ नेते पांडुरंग बाबुराव म्हातुकडे यांची नुकतीच भाजप जेष्ठ नागरीक आघाडी कोल्हापूर जिल्हा अध्यपदी निवड करणेत आली. भाजप जिल्हा कार्यकारिणीच्या बैठकीत जिल्हाध्यक्ष राजवर्धन नाईक निंबाळकर यांनी त्यांच्या नावाची घोषणा केली.
जनसंघामध्य कार्यरत असलेले १९६० पासून पांडुरंग म्हातुकडे यांनी १९६५ साली अटलबिहारी वाजपेयी यांच्या नेतृत्वाखाली दिल्ली येथे कच्छ सत्याग्रहात सहभाग घेतला, तसेच १९७१ सालच्या बांगलादेश मान्यता दिल्ली येथील सत्यग्रहात सहभागी झाले. १९७५ सालच्या आणीबाणीच्या काळात ४१ दिवसाचा तुरुगवास भोगला. जनसंघात कार्यरत असताना, इचलकरंजी शहर अध्यक्ष, शहरमंत्री, जिल्हा उपाध्यक्ष म्हणून कार्य केले आहे. भारतीय जनता पार्ट मध्ये असताना इचलकरंजी शहर उपाध्यक्ष, जिल्हा अध्यक्ष व राज्य कार्यकारणी सदस्य म्हणून पार्टीमध्ये कार्यरत राहून जिल्हा व राज्य कार्यकारणी सदस्य म्हणून कार्य केले आहे.
भाजपा जेष्ठ नागरीक कोल्हापूर जिल्हा अध्यक्षपदीचे प्रमाणपत्र खासदार धंनजय महाडीक, प्रदेश उपाध्यक्ष सुरेश हाळवणकर, मा. मंत्री प्रकाश आवाडे, यांच्या हस्ते प्रदान करणेत आले.
सदर निवडीसाठी भाजप महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष सुरेशराव हाळवणकर, मा. मंत्री प्रकाश आवाडे, आमदार राहुल आवाडे यांचे सहाकार्य लाभले.
पांडुरंग म्हातुकडे यांना निवडीचे पत्र देताना माजी आमदार सुरेशराव हाळवणकर
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800







