ICHMH51NEWS.IN
9921600800

शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान तर्फे दुर्गामाता दौडचे आयोजन

👇बातमी ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान तर्फे दुर्गामाता दौडचे आयोजन

इचलकरंजी (प्रतिनिधी) – प्रतिवर्षाप्रमाणे  शारदीय नवरात्रोत्सवानिमित्त श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्यावतीने श्री दुर्गामाता दौडीचे आयोजन करण्यात आले आहे. घटस्थापना दिनांक २२ सप्टेंबरपासून ते विजयादशमीपर्यंत दररोज पहाटे साडेपाच वाजता कॉ. के. एल. मलाबादे चौकातून दौड काढण्यात येणार आहे. युवक भगवा फेटा, पांढरी टोपी, भगवा ध्वज व शस्त्रांसह दुर्गामाता, भारतमाता आणि धर्मवीरांचा जयघोष करणार आहेत. मंदिरांमध्ये देवीची आरती होईल तर नागरिक रांगोळी व फुलांच्या वर्षावाने स्वागत करतील. आयोजकांनी हजारो युवकांनी उत्साहाने सहभागी व्हावे, असे आवाहन केले आहे. समारोप सोहळा विजयादशमीला होणार आहे.

ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA

घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

पुढे वाचा