लव्ह जिहाद विरोधी कायद्यासाठी अंबाबाईला साकडे,मुख्यमंत्र्यांना १ लाख सह्याचे निवेदन देणार
कोल्हापूर – नवरात्रोत्सवानिमित्त ‘लव्ह जिहाद विरोधी कायदा’ तात्काळ लागू करावा, या मागणीसाठी श्री महालक्ष्मीदेवी-आई अंबाबाईला साकडे घालण्यात आले. उत्तरप्रदेश, गुजरात, राजस्थानप्रमाणे महाराष्ट्रातही कठोर कायदा व्हावा यासाठी कोल्हापूर जिल्ह्यात एक लाख स्वाक्षऱ्या गोळा करून मुख्यमंत्री यांना निवेदन सादर करण्यात येणार आहे.
या प्रसंगी हिंदु जनजागृती समितीच्या कु. प्रतिभा तावरे यांनी ‘‘लव्ह जिहाद हे संघटित वैचारिक युद्ध असून त्यात धर्मांतरण, शोषण व दहशतवादी कारवाया होतात. त्यामुळे राज्यात तातडीने कठोर कायदा व्हावा,’’ असे सांगितले.
यावेळी शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख किशोर घाटगे, हिंदू एकता आंदोलनाचे शहरप्रमुख गजानन तोडकर, दिलीप भिवटे, सेवाव्रत प्रतिष्ठानचे संभाजी (बंडा) साळुंखे, महाराष्ट्र मंदिर महासंघाचे अशोक गुरव, महाराजा प्रतिष्ठानचे निरंजन शिंदे, मराठा तितुका मेळवावाचे योगेश केरकर, हिंदू महासभेचे प्रशांत पाटील, श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे विजय चौगुले, उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे तालुकाप्रमुख राजू यादव, विश्व हिंदु परिषदेच्या वंदना बंबलवाड, हिंदु जनजागृती समितीचे शिवानंद स्वामी, मधुकर नाझरे, कु. प्रतिभा तावरे, सौ. प्रीती पवार, सचिन भोसले, कैलास (आबा) जाधव आदी मान्यवर उपस्थित होते.
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800







