ICHMH51NEWS.IN
9921600800

पूर्ववैमनस्यातून जातीवाचक शिवीगाळ करीत दाम्पत्यावर कोयत्याने जीवघेणा हल्ला 

👇बातमी ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

पूर्ववैमनस्यातून जातीवाचक शिवीगाळ करीत दाम्पत्यावर कोयत्याने जीवघेणा हल्ला 

इचलकरंजी

कबनूर (ता. हातकणंगले) येथे शनिवारी सकाळी ग्रामपंचायत समोर दाम्पत्यावर कोयत्याने जीवघेणा हल्ला झाल्याची धक्कादायक घटना घडली. याप्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

फिर्यादी प्रमोद बाबासो शिंगे (वय ३९, रा. सिद्धार्थनगर, कबनूर) हे आपल्या गाडीत बसले असताना आरोपी जमीर मुलाणी (वय ५०), आर्यन मुलाणी (वय ३०, रा. जांभळी, ता. शिरोळ) व त्यांचे दोन अनोळखी मित्र घटनास्थळी आले. फिर्यादींच्या मित्राने आरोपीच्या मुलीशी कोर्ट मॅरेज केले होते व त्यास फिर्यादी यांनी मदत केली होती.तो राग मनात धरून शिवीगाळ करत हल्ला केला.

आरोपींनी कोयत्याने वार करून फिर्यादींच्या उजव्या हाताचे एक बोट तोडले तसेच हात व खांद्यावर गंभीर दुखापत केली. फिर्यादींची पत्नी अश्विनी शिंगे यांनाही उजव्या हातावर वार करून जखमी केले. यावेळी गाडी फोडूनही नुकसान करण्यात आले.

या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास मा.विक्रांत गायकवाड, उपविभागीय पोलीस अधिकारी, इचलकरंजी विभाग यांच्याकडे असून, प्रभारी अधिकारी स.पो.नि. वायदंडे आहेत.

ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA

घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

पुढे वाचा