ICHMH51NEWS.IN
9921600800

साक्षीदार झाल्याचा राग धरुन दुचाकी व घराचे नुकसान,दोन जणांविरुद्ध गुन्हा दाखल

👇बातमी ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

साक्षीदार झाल्याचा राग धरुन दुचाकी व घराचे नुकसान,दोन जणांविरुद्ध गुन्हा दाखल

इचलकरंजी:

शहापुर पोलीस ठाणे हद्दीत संगमनगर (तारदाळ) येथे एका सेवानिवृत्त कर्मचाऱ्याच्या घरी जाऊन दोघांनी मोटारसायकल व घराच्या पार्किंगला आग लावल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकरणी शहापुर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

फिर्यादी तात्यासो शिवलींग खिलारे (वय ६०, रा. स्वराज कॉलनी, गल्ली नं. ८, संगमनगर तारदाळ) यांनी दिलेल्या माहितीनुसार, १९ सप्टेंबर रोजी रात्री ११ वाजता आरोपी गंगा प्रविण पाटील (रा. ड्रीम रिसॉर्टजवळ, संगमनगर तारदाळ) व अब्दुलकय्युम नौशाद तांबोळी (रा. स्वराज कॉलनी, गल्ली नं. १०, संगमनगर तारदाळ) हे त्यांच्या घरी आले.

यावेळी आरोपी गंगा पाटील याने “तू माझ्या विरोधात शहापुर पोलीस ठाण्यातील खटल्यात साक्षीदार का झालास? तुला सांगितले होते साक्ष होऊ नको, तरीही तू साक्ष दिलीस. आता तुझी मोटारसायकल पेटवून देतो, तसेच तुझ्या घराला देखील आग लावतो,” असे धमकावत आरोपी अब्दुलकय्युम तांबोळी याने पेट्रोल ओतले. त्यानंतर आरोपी गंगा पाटील याने माचीस लावून हिरो होंडा फॅशन प्रो (एमएच-०९ बीजे-८८९५) दुचाकी व घराच्या पार्किंगला आग लावली.

या आगीत अंदाजे १५ हजार रुपयांचे नुकसान झाले. प्रकार घडताच दोघे आरोपी तेथून पसार झाले. फिर्यादी यांनी तत्काळ शहापुर पोलीस ठाण्यात हजर राहून तक्रार दिली.

फिर्यादीच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी पो.हे.कॉ. चळचुक यांनी गुन्हा दाखल केला असून तपास पो.स.ई. फुटे हे करीत आहेत.

ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA

घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

पुढे वाचा